बुलढाणा (हॅलो बुलढाणा) रक्तासारखा घाम गाळून मोत्यासारखं सोयाबीन पिकवलं पण आता बाजारात त्याला कवडीमोल भाव मिळतोय, सरकारनं जाहीर केलेल्या हमीभावापेक्षाही कमी दरानं सोयाबीन विकलं जात असल्यानं शेतकरी ‘दाजी’ संकटात तर ‘लाडकी बहीण’ दीड हजार खात्यात पडल्याने बँकेत गर्दी करताना दिसून येत आहे.परंतु ‘लाडक्या बहिणींना’ महिन्याकाठी दीड हजार देण्यात येत असले तरी, ही सर्व रक्कम ‘दाजीच्या’ सोयाबीनमधून ढापले जात असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहे.
महायुती सरकार एवढे सत्तालोलूप झाले काय?असा प्रश्न सध्या विचारला जात आहे.मूळ प्रश्नांची सोडवणुक न करता ‘लाडक्या’ योजना सुरू करण्यात सत्ताधारी धन्यता मानत आहेत. सध्या विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून एकीकडे ‘लाडक्या बहीणींना’
दरमहा दिड हजार रुपये देण्यात येत आहेत. तर दुसरीकडे शेतकरी ‘दाजींच्या’ सोयाबीनला कोडीमोल भाव मिळत आहे.या
‘लाडक्या बहिणीला’ देण्यात येणारे हे सगळे पैसे ‘दाजीच्या’ सोयाबीनमधून मारले जात असल्याचा उघड आरोप होत आहे. सोयाबीनला सरकारचा हमीभाव ४९०० रुपये प्रतिक्विंटल मिळतो. परंतु सरकारी धोरणामुळे
सध्या बाजारातील अनिश्चिततेची परिस्थिती पाहता ४००० रुपये दरानेही सोयाबीन खरेदी करण्यासाठी व्यापारी धजावत नाहीत त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा शेतकरी ‘दाजी’ हवालदिल दिसून येत आहे.
यावर्षी खरीप हंगामात वेळेवर पेरण्या पूर्ण
झाल्याने आणि पावसानेही कमी जास्त प्रमाणात अपेक्षीत साथ दिल्याने सोयाबीन उत्पादन अधिक होण्याची शक्यता आहे. परंतु मागील पाच वर्षातील सर्वात कमी दराने सध्या नवीन सोयाबीन बाजारात
येण्यापूर्वीच सोयाबीनची खरेदी सुरू आहे. कोसळलेले सोयाबीनचे दर पाहून सोयाबीन
उत्पादनासाठी केलेला खर्चही निघणार नसल्याने
शेतकरी चिंताक्रांत झाल्याचे अस्वस्थ चित्र आहे.