मोताळा(हॅलो बुलढाणा) मोताळा तालुक्यातील मौजे आडविहीर , महालपिंपरी, तालखेड वरूड गाव जोड रस्त्याचे मजबुतीकरण काम करणे संदर्भात आडवीहीर येथील सामाजिक कार्यकर्ते अमोल खर्चे व इतर शेतकऱ्यांनी रस्त्यावर दोन दिवसापासून आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. मुसळधार पावसातही उपोषण सुरू असून नाकर्त्या शासन प्रशासनाने उपोषणकर्त्यांची कोणतीही दाखल घेतली नाही.
त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी सदर माहिती आझाद हिंद शेतकरी संघटनेचे अँड सतीशचंद्र रोठे यांना दिली. त्यानुसार सदर गंभीर बाबीची दखल घेत आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीशचंद्र रोठे यांनी निवासी जिल्हाधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व संबंधितां सोबत चर्चा केली. तर 24 तासात उपोषणकर्त्यांच्या मागणीची आणि उपोषणाची दखल घेण्याचा अल्टिमेट दिला. अन्यथा आझाद हिंद शेतकरी संघटना आंदोलनात सहभागी होईल असा इशाराही दिला. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता व संबंधित प्रशासनाने अवघ्या काही तासात उपोषणकर्त्यांची भेट घेतली. लेखी पत्र देत सदर रस्त्याच्या अनुषंगाने शेतकऱ्यांचे दानपत्र मिळाल्यास त्वरित निधी मंजूर करून काम करण्याचे मान्यही केले.
▪️उशिराने का होईना दखल घेतली!
सार्वजनिक बांधकाम विभागाने उशिरा का होईना दखल घेतल्याबद्दल आभारच परंतु लेखी दिलेल्या पत्रानुसार पुढील कारवाई पूर्ण होईपर्यंत आझाद हिंद स्वस्त बसणार नाही.अशी प्रतिक्रिया अँड सतीशचंद्र रोठे यांनी दिली.