spot_img
spot_img

‘प्यास अभी बाकी है!’ म्हणणाऱ्या बुलढाणेकरांची चिंता मिटली! -येळगाव धरण 100 टक्के भरले! -2 स्वयंचलित गेट उघडले!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) प्रामुख्याने उन्हाळ्यात धरणांनी तळ गाठला की,उशाला असलेले धरण सुद्धा घशाला कोरड पाडते.परंतु येळगाव धरण 100% भरल्यामुळे सव्वालाख बुलढाणा शहर व परिसरवासियांचे मोठे ‘टेन्शन’ दूर झाले आहे.आज पहाटे धरण ओव्हर फ्लो झाल्याने धरणाचे स्वयंचलित 2 गेट उघडण्यात आले आहे.

बुलढाणा तालुक्यातील परिसरातील मस, पल ढग असे काही लघु व माध्यम प्रकल्प खळाळून वाहत आहेत. येळगाव धरणात 100 टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे.गेल्या काही दिवसापासून येळगाव धरणात थेंबे थेंबे तळे साचत आहे.आता मात्र येळगाव धरणाची जल पातळी 100 टक्क्यांवर आली आहे. बुलढाणा चिखली राज्यमार्गावर असलेल्या येळगाव धरणावरून बुलढाणा शहरासह पंचक्रोशीतील गावांना पाणी पुरवठा करण्यात येतो. धरणातील साठा कमी असल्यामुळे सव्वा लाख नागरिकांसह प्रशासनाची डोकेदुखी वाढली होती. मात्र काही दिवसापासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे येळगाव धरणात 100% जलसाठा उपलब्ध झाल्याची सुखद वार्ता आहे.दरम्यान जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची समस्या असून ग्रामस्थांची तहान टँकरवर भागविल्या जात आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!