बुलढाणा (हॅलो बुलढाणा) महिला सुरक्षिततेला दुय्यम स्थान दिल्यामुळे राज्यात बदलापुर, कोलकाता सारख्या घटना घडत असुन शासन मात्र बघ्याची भुमिका घेत आहे. अश्या ह्या उदासीन सत्तालोलूप सरकारच्या निषेधार्थ बुलढाणा शहर बंद ठेवण्याची हाक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस व महाविकास आघाडी च्या वतीने देणात आली आहे.
24 ऑगस्ट शनिवारी सकाळी नऊ वाजता येथील जयस्तंभ चौकात बुलढाणा शहर बंद आंदोलन यशस्वी करण्यासाठी, सर्व काँगेस पदाधिकारी कार्यकर्ते यांनी हजर राहावे,असे आवाहन काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.