बुलढाणा (हॅलो बुलढाणा)-मुंबईत आंदोलना दरम्यान रविकांत तुपकर म्हणाले की,शेतकऱ्यांचा आवाज दाबता येणार नाही. काही दिवसात आपल्या हक्कासाठी संपूर्ण राज्यातील शेतकरी लवकरच रस्त्यावर उतरलेले दिसतील, मग मात्र ते सरकारला जड जाईल, असा इशारा रविकांत तुपकरांनी दिला आहे.
रविकांत तुपकरांनी शेतकरी कर्जमुक्ती, हक्काचा पिकविमा, सोयाबीन-कापूस दरवाढ यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी शेतकरी आत्महत्येचे प्रात्यक्षिक आंदोलनाचा इशारा दिला होता. या आंदोलनासाठी जात असतांना त्यांना मरीन ड्राईव्ह परिसरात पोलिसांनी अटक केली. तुपकरांना अटक जरी केली असली तरीही शेतकऱ्यांनी मात्र गिरगाव चौपाटीवर शेतकरी आत्महत्येचे प्रात्यक्षिक करून आंदोलन केलेच. सध्या रविकांत तुपकरांना आझाद मैदान पोलीस स्टेशन परिसरात ठेवले असून त्यांना किल्ला कोर्टात हजर करण्यात येणार आहे. मला जरी पोलिसांनी अटक केली असली तरी शेतकऱ्यांचा आवाज दाबता येणार नाही. काही दिवसात आपल्या हक्कासाठी संपूर्ण राज्यातील शेतकरी लावकरच रस्त्यावर उतरलेले दिसतील, मग मात्र ते सरकारला जड जाईल, असा इशारा रविकांत तुपकरांनी दिला आहे.