बुलढाणा (हॅलो बुलडाणा) वरवंडच्या घाटावरून तरोडा-मोताळ्याच्या घाटाखाली जंगलातील डोंगर-दऱ्या पार करत भर पावसातही सद्भावनेचे वादळ घेऊन, कृतज्ञता यात्रेच्या माध्यमातून संगणकीकरण व आधुनिकीकरणातून भारताला सशक्त बनवणाऱ्या स्व. राजीव गांधी यांच्या वैचारिक कर्तुत्वाचा जागर करत कृतज्ञता यात्रेचे मार्गक्रमण आजही चालूच होते. 20 ऑगस्ट सद्भावना दिनापासून बुलढाणा व मोताळा तालुक्यात प्रा. सौ. मीनल संतोष आंबेकर यांच्या मार्गदर्शनपर नेतृत्वाखाली ही कृतज्ञता यात्रा निघाली असून, एखाद्या दिवंगत नेत्याप्रती ही आगळी-वेगळी कृतज्ञता सध्या लक्षवेधी ठरत आहे !
भारताचे माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांची जयंती “सदभावना दिन” म्हणून साजरी केली जाते. याचदिवशी म्हणजे मंगळवार 20 ऑगस्ट रोजी काँग्रेसच्या वतीने सौ. मीनल आंबेकर यांच्या संकल्पनेतून कृतज्ञता यात्रेची सुरुवात बुलढाण्यातून करण्यात आली. देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी ज्या देशसेवकांनी स्वतःचे बलिदान दिले, त्यांच्या स्मरणार्थ तसेच स्व. राजीव गांधींनी देशाला आधुनिक बनवण्यासाठी जे अतुलनिय योगदान दिले, त्याची स्मृती चिरंतर रहावी..यासाठी मिनलताई आंबेकर यांनी या कृतज्ञता यात्रेचे आयोजन केले आहे. उद्घाटन सोहळ्यात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल बोंद्रे होते, तसेच प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष विजय अंभोरे व सरचिटणीस श्याम उमाळकर, ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव घुमरे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. अलकाताई खंडारे, बाबासाहेब भोंडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी आपल्या भाषणातून राजीव गांधी यांनी देशाच्या विकासात केलेल्या अतुल्य योगदानबद्दल आपले विचार व्यक्त केले.
कृतज्ञता यात्रा आयोजना मागची भूमिका मिनलताई आंबेकर यांनी प्रास्ताविकेतून व्यक्त केली. याप्रसंगी जेष्ठ नेते प्रा. संतोष आंबेकर, महिला काँग्रेसचे अध्यक्षा सौ. मंगला पाटील, शहर काँग्रेसचे अध्यक्ष दत्ता काकस, जिल्हा एनएसयूआय अध्यक्ष शैलेश खेडकर, पुरुषोत्तम देवकर, चित्रांगण खंडारे, विनोद बेंडवाल, मोईन काजी, सौ नवनिता चव्हाण, सौ. नंदिनी टारपे, सौ. प्रमिलाताई गवई, सौ. रंजना चव्हाण, आशा इंगळे, अंकुश वाघ, तुळशीराम नाईक, सुनंदा पवार, कल्पना पाटील, उषा लहाने, ज्योत्स्ना जाधव, बानो बी चौधरी, सुनंदा पवारआदी मान्यवर उपस्थित होते.
▪️राजीवजींनी महिलांना आत्मसन्मान दिला..
आज तिसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवार 22 ऑगस्ट रोजी ही यात्रा डोंगरदऱ्या पार करून घाटाखाली तर बोरखेड येथे पोहोचली. त्यानंतर तरोडा व कोथळी येथे यात्रेचे जोरदार स्वागत झाले. भर पावसात कुठल्याही वादळाची परवा न करता राजीव गांधी यांनी देशासाठी जे योगदान दिले व महिलांप्रती त्यांनी जो आत्मसन्मान निर्माण केला, ते विचार यात्रेच्या माध्यमातून तळागाळात पोहोचवल्या जात असल्याचे मीनलताई आंबेकर म्हणाल्या.