डोणगाव (हॅलो बुलढाणा/अनिल राठोड) सर्वात मोठी डोणगाव ग्रामपंचायत असून, या ग्रामपंचायत मध्ये सरपंच म्हणून चरण आखाडे अविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये एकच जल्लोष दिसून आला.
बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायतम् हणून डोणगाव ग्रामपंचायत ओळखली जाते. तसेच राजकीय घडामोडी साठी नेहमी चर्चेत असलेल्या सरपंच पदावर अविश्वास आल्यानंतर सरपंच पदाची निवडणूक 22 ऑगस्ट रोजी घेण्यात आली. जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या आदेशानुसार 22 ऑगस्ट 2024 रोजी डोणगाव ग्रामपंचायत ची निवडणूक निश्चित करण्यात आली होती. सकाळी दहा वाजेपासून ते बारा वाजेपर्यंत नामनिर्देशक प्रक्रिया घेण्यात आली दहा ते बारा वाजेपर्यंत या वेळात एक अर्ज प्राप्त झाला असून दुपारी दोन वाजेपर्यंत सभा सुरू झाल्यापासून अर्ज छाननी करण्यात आली दोन वाजून 30 मिनिटांनी अर्ज छाननी करण्यात आली असून अखेर सरपंच पदाचे दावेदार म्हणून अविरोध चरण पाटील आखाडे यांची सरपंच पदासाठी घोषणा करण्यात आली.