मलकापूर (हॅलो बुलढणा/ करण झनके) आदिवासी कोळी महादेव जमातीच्या वतीने आमरण उपोषण साठी आज 10 दिवस झाले परंतु न्याय न मिळाल्या मुळे शोक संदेश ची पत्रिका वाटून उपोषण कर्त्यानी शेवटी टक्कल करून प्रशासना विरोधात रोष व्यक्त केला आहे.
मलकापूर येथील तहसील कार्यालय समोर गेल्या दहा दिवसांपासून आदिवासी कोळी महादेव जमातीच्या अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र सुलभरीत्या देण्या साठी बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरु केले होते. दहा दिवस झाल्यावर ही प्रशासनाने कोणतीही हालचाल केली नसल्याने 22 ऑगस्ट रोजी उपोषणकर्त्यांनी शेवटी शोक संदेश पत्रिका वितरित करून आज टक्कल करून प्रशासनाचा निषेध दर्शविला आहे. दरम्यान
तहसीलदार यांच्या कडून चुकीच्या पद्धतीने पत्र व्यवहार करण्यात आले आहेत. आमचे उपोषण चुकीच्या पद्धतीने करत असल्याचे कारणाने ते बेकायदेशीर असल्याचे म्हणाले.