spot_img
spot_img

EXCLUSIVE- मी बियाण्यासारखा,जमिनीत दाबाल तर जमीन फाडून उगवेल…! “ताई आणी दाजी” घाबरले….. मनोज लाहूडकर

चिखली (हॅलो बुलडाणा)एका 29 वर्षाच्या पोराला घाबरवण्यासाठी जर गृहमंत्रालयातून आदेश द्यावे लागत असतील,तर नेतृत्वाने आपले खुजेपन मान्य केले असा त्याचा अर्थ होतो. अशा मनाने आणी कार्याने झिरो असलेल्या सत्ताधारी लोकासमोर झुकलो नाही,म्हणून आपल्याला झुकवण्यासाठी कायद्याचा दुरुपयोग करण्यात येत आहे.पण लोकांची समर्थ साथ असल्याने असल्या विघातक प्रवृत्तीविरुद्ध आपण नेहमी उभे राहू. आज सत्ताधारी आमदार सत्तेच्या जोरावर माझ्यासारख्या सत्तेच्या विरोधात असलेल्या लोकांना दाबण्याचा प्रयत्न करीत आहे,पण मी एका शेतकऱ्याचा पोरगा आहे,जमिनीत दाबल्यावर बी ज्याप्रमाणे जमिनीचे पोट फाडून अंकुरते तसेंच तुम्ही आम्हाला जेवढं खोल दाबण्याचा प्रयत्न कराल तेवढ्या अधिक वेगाने आम्ही तुमचा दाब झुगारून वर येऊ असे उदयनगर येथील युवा सरपंच मनोज लाहुडकर हॅलो बुलढाणाशी बोलताना म्हणाले.

ताई आणी दाजी यांना हातातील सत्ता जातांना दिसत आहे,म्हणून त्यांनी मी व माझेसारख्या अनेकांना त्रास देने सुरु केले आहे,पण त्यांचे हे केविलवाने प्रयत्न त्यांना जनतेच्या नजरेतून खाली उतरवत आहेत.तेव्हा ताई आणी दाजी यांनी राहिलेल्या वेळेत तरी जनतेची कामे करावीत नाहीतर माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला तडीपार करण्याकरिता पूर्ण प्रयत्न करून आपली राहिलेली पत सांभाळण्याचा प्रयत्न करावा.असा टोलाही मनोज लाहुडकर यांनी लागवला.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!