बुलढाणा (हॅलो बुलढाणा) कलकत्ता येथे निवासी महिला डॉक्टर वर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली, ही घटना ताजी असतानाच बदलापूर येथे एका चिमुकलीवर अत्याचार करण्यात आले. त्या पाठोपाठ अकोला आणि नाशिक मध्ये सुध्दा मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत.. या घटनेचा निषेध करत उद्धव ठाकरे शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख जिजा राठोड यांच्या नेतृत्वात बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. राज्य आणि केंद्र सरकार महिला मुलींच्या सुरक्षिततेसाठी अपयशी ठरत असल्याचा आरोप करत यावेळी राज्य व केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.
- Hellobuldana