बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बदलापुर येथिल शाळकरी मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार विरोधात आज २१ रोज़ी जयस्तंभ चौक बुलडाणा येथे महाविकास आघाडी तर्फे बदलापूर येथील घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला.
पीडितेला न्याय मिळण्यासाठी बदलापूर येथील घटनेची सखोल चौकशी होऊन आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी या घटनेची जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा या व इतर मागण्यां संदर्भात घोषणाबाजी देत तीव्र आंदोलन करण्यात आले.यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.