मलकापूर (हॅलो बुलढाणा/रविंद्र गव्हाळे) राष्ट्रीय महामार्ग जवळ असलेल्या बेलाड फाट्याजवळून दोन अल्पवयीन मुलींना घेऊन दोघे पसार झाले होते.दरम्यान मलकापूर पोलिसांनी 72 तासात आरोपींना बेड्या ठोकल्या!
गेल्या अनेक दिवसापासून अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आरोपी त्यांना अनेक अमिष दाखवून आपल्या जाळ्यामध्ये कैद करतात आणि वेळ पडली तर त्यांच्यावर अत्याचार करून खून करून आज्ञास्थळी फेकून देतात.शिवाय मुलींना पळविणारी टोळी सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. मलकापूर तालुक्यातील बेलाड फाट्यावरून दोन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळविल्याची घटना नुकतीच घडली होती. त्यांचा शोध घेऊन मलकापूर पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी बजावत भुसावळ येथून त्या दोन मुलींसह दोन मुलांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवित तीन दिवसातच छडा लावला आहे.याप्रकरणी एका पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. राष्ट्रीय महामार्गानजीक बेलाड फाट्यावर काही लोक वस्ती करून निवासाला आहेत. त्याच वस्तीतील दोन अल्पवयीन तरुणींना फूस लावून पळविल्याची घटना शनिवारी उघडकीस आली होती. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय महादेव खोणे, पोलीस ईश्वर वाघ, पीएसआय मीनल शिंदे यांनी भुसावळ येथून त्या दोन अल्पवयीन मुली व दोन तरुणांना पोलिसांनी आणले. त्यांना बुलढाणा येथील बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. यापूर्वीही आरोपींवर पोक्सोचा गुन्हा दाखल असण्याची माहिती समोर आली आहे.