spot_img
spot_img

राशन गोदाम मृत्यूशय्येवर!

डोणगाव (हॅलो बुलढाणा/ अनिल राठोड ) डोणगाव येथे असलेले शासकीय धान्याचे गोदाम सध्या शेवटची घटका मोजत आहे.डोणगाव अंतर्गत जवळपास 38 रेशन दुकानदारांना शासकीय धान्य गोदाम मधून

शेकडो क्विटल गहू आणि तांदूळ दर
महिन्याला मिळतो. तो नियमितपणे
वाटप होत असतो परंतु इमारतीकडे बघून राशन दुकानदार व कर्मचारी वर्ग तसेच हमाल कामगार यांच्या मनामध्ये सुद्धा गोदामाची भिंत पडेल का अशा भीती व्यक्त होत आहे.
जोरात पाऊस आला तर सदर गोदाम मध्ये पाऊस शिरतो ठीक ठिकाणी मोठमोठे भेगा पडल्या आहेत. गोडाऊनच्या भिंती पडलेल्या आहे. शेवटची घटका मोजणाऱ्या या गोदामाची इमारत दुरुस्ती करून देण्यात यावी अशी मागणी होत आहे

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!