3.6 C
New York
Friday, November 22, 2024

Buy now

spot_img
spot_img

‘आशेच्या’ ‘किरण’ ताई!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) आपल्या आयुष्यात कधी, कोणी, कसं आणि किती काळासाठी यावं हे आपण ठरवू शकत नाही.. तसंच किती अल्पकाळात कोणाशी किती ऋणानुबंध जुळावा हेही आपल्या हातात नक्कीच नाही..

किरण ताई आणि आम्ही.. याविषयी बोलताना लिहिताना मला जाणवलं की तसं बघायला गेलं तर आताच तर भेटलो आपण ताईंना पहिल्यांदा…
…आणि शेवटचं ही आत्ताच भेटलो
पण या अगदी अल्प काळात ताईंकडून जे मिळालं ते‌ जन्मोजन्मी पुरणारं आहे…
आपल्या पर्वताएव्हढ्या दुःखाचं तीळाइतकही भांडवल न करणाऱ्या ताई..
आपलं अस्तित्व जणु फक्त इतरांच्या आयुष्यात आनंद पेरण्यासाठी आहे याची जाणीव करून देणाऱ्या ताई…
सकारात्मकतेची highest level किती असु शकते ह्याचं उदाहरण म्हणजे किरण ताई..
आपलं शरीर यातनांनी जखडलेल असताना सभोवताच्या प्रत्येकाला जगण्याचा तत्त्वज्ञान सहज सोपं करून सांगणाऱ्या किरण ताई…
हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यावर स्टाफ मधल्या प्रत्येकाला चॉकलेटरुपी गोडवा देणाऱ्या किरण ताई..
कुठलचं आशादायी चित्र दिसत नसताना सभोवतालचा फक्त आनंद आणि सकारात्मकता
टीप कागदासारख्या टिपणाऱ्या किरण ताई…
हॉलमध्ये ऑक्सिजन लावून व्हीलचेअर वर बसून आपल्या विद्यार्थ्यांच्या गायनाचा आनंद घेणाऱ्या किरण ताई..
आपलं केवळ उठणं-बसणं-झोपणंच नव्हे तर श्वास घेणे कठीण झालेल असताना इतरांची आवड लक्षात ठेवून पूर्ण करणाऱ्या किरण ताई…
काय आणि किती लिहू तुमच्याबद्दल ….
डोळ्यातल्या आसवांना तुमचा प्रसन्न चेहरा आठवून ओघळण्याची हिंमत होत नाही…
खरंच ताई तुमच्या सारखी उर्जादायी व्यक्ती मी कुठेच पाहिली नाही..
तुम्ही ठरवलं असलं तरी मला अपेक्षित नव्हतंच तुमचं जाणं..
शिकायचं राहुनच गेलं मृण्मयीचं गाणं…

असं असलं तरी..
आयुष्यात कुठल्याही वळणावर,संकटात, दुःखात एक नक्की घडणार आहे..
शरीर अनंत वेदना सहन करत असताना हातात निशिगंध घेतलेली, चेहऱ्यावर हसू वसलेली किरणताईंची छबी संकटातून बाहेर पडण्यासाठी प्रेरणा देत राहणार आहे..

डॉ.वैशाली गजेंद्र निकम 
बुलढाणा 

‘हॅलो बुलडाणा’ परिवारातर्फे किरण ताईंना भावपूर्ण श्रद्धांजली!

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!