spot_img
spot_img

ब्रेकिंग! काँग्रेसमध्ये संजय राठोड यांची लॉटरी लागली?

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) बुलढाणा विधानसभा निवडणुकीत अनेक जण काँग्रेसमध्ये इच्छुक होते. त्यामध्ये संजय राठोड यांना तिकीट देत येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्यासह राज्याचे वरिष्ठ नेते तथा प्रदेश काँग्रेसचे अनेक पदाधिकारी जिल्हास्तरीय आढावा बैठकीसाठी बुलढाण्यात आले असता, त्यांच्यापुढे बुलढाणा व मोताळा तालुक्यातील हजारो युवक कार्यकर्त्यांनी संजय राठोड यांच्यासाठी जोरदार शक्तिप्रदर्शन करत बुलढाणा विधानसभेसाठी त्यांना काँग्रेसचे उमेदवारी देण्याची जोरदार मागणी केली होती.
आगामी काळात महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या आहेत, त्या अनुषंगाने सोमवार 13 ऑगस्ट रोजी बुलडाणा येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रभारी रमेश चैन्नीथला, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विधानसभा विरोधी पक्षनेते, विजय वडेट्टीवार, विधानपरिषद विरोधी पक्षनेते सतेज पाटील, प्रदेश संघटन प्रभारी नानाभाऊ गावंडे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीतच संजय राठोड यांना पसंती देण्यातआल्याचे वृत्त हाती आले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!