बुलढाणा (हॅलो बुलढाणा/राजेंद्र घोराडे) मागील एका महिन्यापासून डॉ. राजेंद्र शिंगणे जिल्हाभरातील सर्व नागरिक, राजकीय विश्लेषक, पत्रकार या सर्वांना कन्फ्युज करत आहेत. आता ते स्वतः कन्फयुज आहेत म्हणून काहीबाही बोलतात? की हा राजकीय षडयंत्राचा भाग आहे ? हे समजणें आवश्यक आहे.असे हॅलो बुलढाणाशी बोलताना गायत्री शिंगणे म्हणाल्या.
लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार गटाचे जे पानिपत झाले, ते पाहून राज्यभरातील शरद पवार यांना सोडून गेलेल्या, बऱ्याच आमदारांना शरद पवार हे अतिशय आदरणीय असल्याची उपरती होत आहे.
डॉक्टर शिंगणे हे देखील माध्यम प्रतिनिधी समोर काहीतरी विधान करतात आणि नंतर फोन स्विच ऑफ करून बसतात.आपण केलेल्या विधानाचा सरळ अर्थ काय? हे त्यांनी स्पष्ट करायला हवा .मुळात डॉ. शिंगणे यांना सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघांमध्ये अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट यांच्यात लढतच नको आहे.कारण डॉक्टर शिंगणे हे जरी नाईलाजास्त अजित पवार गटात गेलेले असले तरी सिंदखेड राजा मतदार संघातील जनता मात्र त्यांच्या पाठोपाठ नाईलाजानेअजित पवार गटात गेलेली नाही,मातृतीर्थातील जनता अद्यापही शरद पवार नाव व शरद पवार यांचा पक्ष यांच्याशी बांधिलकी राखून आहे.त्यामुळेच डॉक्टर शिंगणे यांना शरद पवार यांच्या विषयी विविध माध्यमातून आदर प्रगट करावा लागतोय.
त्यामुळे डॉक्टर शिंगणे यांनी लवकर योग्य ते निर्णय घ्यावा,तसेही नाईलाजाने काही करन्यापेक्षा निवृत्ती घेतलेली केव्हाही चांगले, नाहीतर त्यांची अवस्था “ना घर का ना घाट का” अशी होईल असा त्यांनी कु. गायत्री यांनी लगावला.