बुलढाणा (हॅलो बुलढाणा) वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या रमगिरी महाराज यांच्यावर बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाणे मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रेषित मोहम्मद पैगंबर ( स) बद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या रमगिरी महाराज यांच्या विरुद्ध बुलडाणा ग्रामीण ठाणे मध्ये मोलवी तहसिन शाह यांची तक्रारी वरून भारतीय न्याय सहिता कलम २९९ द्वारे गुन्हा दाखल करण्यात आला.
या वेळी मुफ्ती मुजीब, मौलाना शरीफ खान, हाफिझ मतीन,हाफिझ शाहेजाद, हाफिझ युसुफ, हाफिझ आकील,,हाफिझ युसुफ, अब्दुल रऊफ,आरिफ खान, जुनेद खान,हाजी ईल्यास, अफसर खान, याकूब पठाण, डॉ मोबिन, हरिस भाई,आमिर काझी, अल्ताफ खान, शेख नसीम, आदी हजर होते.