साखरखेर्डा ( हॅलो बुलडाणा / दर्शन गवई)साखरखेर्डा येथील श्रीमज्जजगद्गूरु पलसिध्द शिवाचार्य महास्वामींचा ९६६ वा स्मृतीमहोत्सव २२ , २३ , २४ ऑगस्ट रोजी पलसिध्द महास्वामी मठात साजरा होत आहे . या महोत्सवात धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार असून या मठाच्या अधिपत्याखाली असलेल्या सर्व मठाचे मठाधिपती उपस्थित राहणार आहेत .
विरशैव लिंगायत संप्रदायाची काशी म्हणून ओळख असलेल्या साखरखेर्डा येथील श्री पलसिध्द महास्वामी मठाला एक हजार वर्षांची अंख्यायीका आहे . वीरशैव लिंगायत धर्म मानवतावादी धर्म असून त्याची पताका खांद्यावर घेऊन भारत भ्रमण करीत असताना महास्वामी श्री पलसिध्द महाराज यांनी साखरखेर्डा येथे वास्तव्य केले होते . त्यांनी दंडकारण्यात साखरखेर्डा येथे ध्यानस्त बसून तपश्र्चर्या केली . आणि समाधिस्थ झाले . आज साखरखेर्डा येथे त्यांचा भव्य मठ असून त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ महोत्सवाचे आयोजन करण्यात येते . २२ ला सकाळी ६ वाजता उत्सवाला प्रारंभ होत असून नामस्मरण एक्का प्रारंभ , दुपारी १२ वाजता शिवदीक्षा व गुरुमंत्र संस्कार विधी व येणाऱ्या दिंड्यांचे स्वागत मठाधिपती सिध्दलिंग शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते करण्यात येणार आहे . दुपारी ४ वाजता साखरखेर्डा नगरीतून पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे . रात्री ८ वाजता ऋषिकेश रिकामे यांचा भक्तीसंगिताचा कार्यक्रम , रात्री १० वाजता जागर . २३ ला सकाळी श्रीच्या मुर्तीस व संजिवन समाधीस रुद्राभिषेक व महापुजा , १० वाजता स्वरशिरोमनी हावसी पन्नासे व संच यांचा भजनाचा कार्यक्रम , व्याख्यान , आणि धर्मसभा अध्यक्ष वेदांन्ताचार्य शिवाचार्यरत्न सद्गूरु सिध्दलींग शिवाचार्य महाराज हे राहणार असून यावेळी उपस्थित गुरुवर्याचे अशिर्वचन आणि अध्यक्षीय भाषण होणार आहे . दुपारी २ वाजता महाप्रसाद , रात्री ८ वा शि भ प संगमेश्वर महाराज यांचे किर्तन , रात्री शिवजागर . २४ ऑगस्ट रोजी श्रीच्या मुर्तीस व संजीवन समाधीस रुद्राभिषेक , सद्रगूरु सिध्ददयाळ शिवाचार्य महाराज यांचे प्रसादाचे किर्तन , सकाळी ११ वाजता धर्मसभा आणि दुपारी २ वाजता महाप्रसाद वितरण करण्यात येणार आहे . या महोत्सवात सिध्ददयाळ शिवाचार्य महाराज , वेदान्ताचार्य दिगांबर शिवाचार्य महाराज , शिवशंकर शिवाचार्य महाराज , मरुळसिध्द शिवाचार्य महाराज , काशिनाथ शिवाचार्य महाराज , सिध्दचैतन्य शिवाचार्य महाराज , शिवचैतन्य शिवाचार्य महाराज , विश्वचैतन्य शिवाचार्य महाराज , यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत . अशी माहिती संस्थानचे विश्वस्त विश्वनाथ अप्पा जितकर यांनी दिली आहे .