spot_img
spot_img

अब हम बोले तो बोले क्या? गायत्री शिंगणेचे शिष्ट मंडळ कर्जत शिरूर व बीड ला… डॉ.राजेंद्र शिंगणे डायरेक्ट शरद पवारांच्या कार्यक्रमात वर्ध्याला..

बुलढाणा (हॅलो बुलढाणा /राजेंद्र घोराडे) सिंदखेडराजाचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा राष्ट्रवादीतील दोन गटात तळ्यात मळ्यात असा खेळ सुरू आहे. शरद पवार गटात जाऊन त्यांना गायत्री शिंगणे यांनी जेरीस आणले आहे. दरम्यान डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांना पश्चाताप होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे मतदार’अब हम बोले तो बोले क्या?’ या संभ्रमात दिसून येत आहे.

परवा मुंबई येथे महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक उद्धव ठाकरे, शरद पवार , तसेच महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पार पडली.या बैठकीतून ‘काहीतरी” मिळवून घरी निघालेल्या गायत्री शिंगणे या
मुंबईवरून घरी परत येण्या अगोदरच गायत्री शिंगणे यांचे बंधू गौरव शिंगणे व सिंदखेड राजा मतदारसंघातील शरद पवार राष्ट्रवादी गटाचे उत्साहित कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ कर्जत जामखेड येथे जावून आ. रोहित पवार तसेच खा. अमोल कोल्हे यांना भेटले, बिडचे फायरब्रँड आमदार संदीप क्षीरसागर यांची भेट घेऊन,गायत्री शिंगणे यांचा कार्य अहवाल त्यांनी वरील तिघांनाही दिला व या तिघाकडून काही “गुप्त लखोटे” घेऊन गायत्री शिंगणे आपल्या मतदारसंघात पोहचल्या.

तर आज वर्धा येथे शरद पवार यांच्या कार्यक्रमांमध्ये डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी आपली उपस्थिती लावली.या संदर्भात त्यांना विचारणा केली असता आपल्या राजकीय जडणघडणीमध्ये माननीय शरद पवार यांचा प्रमुख वाटा राहिला असून आपण जन्मभर त्यांच्या कायम ऋणातच राहू इच्छितो असे डॉक्टर शिंगणे म्हणाले.सहकारी बँक वाचवण्यासाठी अजित पवार गटात “नाईलाजाने” गेलो असेही ते माध्यम प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले.मागील एक महिन्यापासून डॉक्टर राजेंद्र शिंगणे जे अप्रत्यक्षपणे शरद पवार गटाविषयी बोलत होते,आता प्रत्यक्ष शरद पवारांच्या कार्यक्रमातील त्यांच्या उपस्थितीने काय बोलाव हेच समजत नाही.त्यामुळे सिंदखेडराजा मतदारसंघातील सर्व मतदार नक्कीच म्हणत असतील….अब हम बोले तो क्या बोले…

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!