मलकापूर (हॅलो बुलढाणा / रवींद्र गव्हाळे) हजारो महादेव कोळी समाज बांधव एसटी प्रमाणपत्र मिळण्यासाठी उपोषण स्थळी होणार उपस्थित राहणार आहेत.
महादेव कोळी बांधवाच्या मागण्यांवर या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतही बैठक झाली होती. पण समाजाच्या हाती अद्याप काही लागलं नसल्याने नाराजीचा सूर आहे. हजारो महादेव कोळी भगीनी काळ्या साड्या घालून सरकारचा निषेध करणार आहे. स्वातंत्र्याचा अमृत मोहत्सव एकीकडे साजरा होत असताना परत एकदा विदर्भातील सकल आदिवासी महादेव कोळी समाजाच्या वतीने आमरण उपोषण सुरू आहे.
महादेव कोळी समाजाच्या मागण्या मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यासाठी वेळोवेळी अर्ज विनंती करण्यात आली होती. आंदोलनही करण्यात आलं होतं. मात्र आश्वासनापलीकडे काही मिळत नाही.
मात्र आता मागील 14 तारखेपासून उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण चालू आहे व उपोषणकर्त्यांनी शासनाला ताकीद दिली आहे की जोपर्यंत एसटी प्रमाणपत्र महादेव कोळी बांधवांना मिळत नाही तोपर्यंत उपोषणातून मागे हटणार नाही. बुलढाणा तालुक्यातील नागरिकांना प्रमाणपत्र मिळाले आम्हाला का नाही..? अशी नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.
टीआरटीआय संस्थेवर नॉनट्रायबल अधिकारी नेमणूक करण्यास जात वैधता प्रमाणपत्र सुलभरीत्या उपलब्ध करून द्यावे या प्रमुख मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. महादेव कोळी समाजातील स्त्री पुरुष आबालवृद्ध यांनी उपोषण स्थळी मोठ्या संख्येने हजेरी लावली आहे. काल उपोषण करत्या समाज बांधवाला अस्वस्थ वाटल्यामुळे रुग्णालयामध्ये तात्काळ भरती करण्यात आले आहे.
▪️काय आहेत मागण्या?
विनाअट आदिवासी कोळी समाजातील टोकरे कोळी, ढोर कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी चे जातीचे दाखले कोळी नोंदीवरून सरसकट मिळावेत.
ज्या आदिवासी कोळी समाज बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र मिळाले आहे, त्यांच्या रक्ताच्या नात्यातील व्यक्तीना कोणतेही कागदपत्रं न मागता जात वैधता प्रमाणपत्र मिळावे.
जात पडताळणी समितीच्या वतीने सुरू असलेली तपासणी तात्काळ थांबवावी.
शालेय विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी वैधताबाबत काढलेले शासन परिपत्रक रद्द करण्यात यावे.
तालुका स्तरावर उपविभागीय अधिकारी यानी निर्गम उतारा व पालकांची जात प्रमाणपत्र या पुराव्यावरून जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे.