spot_img
spot_img

तुम्हाला मुलभूत सुविधा भेटतात का हो? -नाली; रस्त्यांचा प्रश्न!

डोणगाव (हॅलो बुलढाणा/ अनिल राठोड)डोणगाव मधील रस्ते नाली पाण्याचा प्रश्न अजून मिटलेला नसून रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे.याकडे लोकप्रतिनिधी दुर्लक्ष होत आहे.

जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून डोणगाव ग्रामपंचायत नावलौकिक आहे. तसेच बुलढाणा जिल्ह्याचे शेवटचे टोक म्हणून सुद्धा डोणगाव गाव असून राजकीय कुरघोडी ग्राम पंचायत मध्ये बघण्यास मिळते परंतु डोणगाव मधील रस्ते नाली पाण्याचा प्रश्न अजून मिटलेला नसून रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. वार्ड क्र.01.02 ला रस्ते व नाल्या पासून दुर्लक्ष ग्रामपंचायत कार्यालय व ग्रामसेवक केले त्यामुळे नागरीक त्रस्त होऊन याबाबत चे निवेदन जिल्हाधिकारी देण्यात आले त्यावेळी उपस्थित आरीफ शाह ताहेर शाह, शेख.अक्रम आतार, .शेख असिम शेख कदीर, .सोहेल शब्बीर शाह, व ईतर मान्यवर उपस्थित होते सविस्तर असे की मोजे डोणगाव ता.मेहकर जि.बुलढाणा येथील वार्ड क्रमांक 01 रहेमत नगर मधील वार्डात पावसामुळे रस्त्यावर पाणी वाहत आहे त्यामुळे सगळे रस्ते खराब झाले लोकांना पाई चालता येत नाही तसेच नाल्याची परिस्थिती अशी खराब झाली की नाल्याचा पाणी रस्त्यावर वाहत आहे या खराब पाणी जमा होत आहे. सध्या डेंगूची साथ सुरू आहे या घाण पाणी मुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होईल अशी बिकट परिस्थिती झाली आहे तरीही ग्रामपंचायत कार्यालयाचे ग्रामसेवक हे वार्ड क्रमांक 01 कडे दुर्लक्ष करीत आहे यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका नकारता येत नाही याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आलेले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!