चांडोळ(हॅलो बुलढाणा/सलमान नसीम अत्तार)आधार लिंक साठी आणखी किती दिवस घेणार आहेत? बँक ऑफ माहाराष्ट्र चांडोळ चे बँक मॅनेजर झोपले आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहन योजने साठी महाराष्ट्र सरकार 199 कोटी रुपये लाडकी बहिणीला देत आहेत पण त्या साठी बँक अकाउंट हे आधार लिंक्स असने गरजेचे आहे.
बँक अकाउंट ला आधार लिंक करण्या साठी चांडोळ व परिसरातील अनेक महिलांनी आपले डाँक्युमेंट दिले आहेत त्याला 10/15 दिवस झाले आहेत तरी देखील बँक खात्याला आधार लिंक झालेच नाही.
चांडोळ व परिसरातील अनेक महिला मध्ये भीती आहे कि आपल्या खात्यात पैसे येईल की नाही यांची चिंता महिला मध्ये दिसून येत आहे.
बरीच महिला बँक चे चक्कर मारून मारून त्रासली आहे, एकतर दिवसाची मजदूरी सोडून बँक मध्ये लाईन लाऊन आधार लिंक झाले आहे की नाही तपासून पाहत आहे व दुसरी कडे बँक चे कर्मचारी म्हणतात की अजून 10/15 दिवस आधार लिंक साठी लागणार आहे, जे महिलांचे आधार लिंक होते त्यांचे 3000 हजार रुपये त्यांच्या खात्यात आले आहे, सर्व महिला मंडळीची व गावाकऱ्याची हीच इच्छा आहे की सर्व महिलांचे आधार लिंक लवकर व्हावे.व त्यानं मुख्यमंत्री लाडकी बहन योजना चे पैसे मिळावे…