जळगाव जामोद(हॅलो बुलढाणा)शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी व महापुरात भ्रष्टाचार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यासाठी वंचित बहुजन व आघाडीचे जिल्हा महासचिव प्रकाश विठ्ठलराव भिसे यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर 14 ऑगस्ट 2024 पासून आमरण उपोषण सुरू झाले आहे.
22 जुलै 2023 रोजी झालेल्या महापुरामुळे हजारो नागरिकांची शेती खरडून गेली शेकडो नागरिक बेघर झाली छोटे मोठे टपरीधारक व्यावसायिक पूर्णतः उद्ध्वस्त झाले, तसेच ज्यांची खरोखर शेती, घरे, दुकाने महापुरात वाहून गेली परंतु ज्यांचे खरोखर नुकसान झाले त्याने अद्यापही मदत मिळालेली नाही. परंतु ज्याची शेती, घरे, दुकाने इ. काहीच नुकसान झाले नाही त्यांना मात्र सक्षम मदत दिली. ज्यांच्या नावावर शेती नाही त्यांना नुकसान भरपाई, ज्यांचे कवडीचे नुकसान नाही परंतु सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या जवळचे आहेत त्यांना लाखोंची मदत घरातील प्रत्येकाच्या नावावर मदत दिल्या गेली, आणि त्याचे पुरावे सुद्धा आमच्याकडे आहेत. ही तर सरळसरळ शासनाची फसवणूक आहे आणि शासनाची फसवणूक करत असताना प्रशासनातील काही कर्मचारी, अधिकारी, कंत्राटी कर्मचारी यांचा या खोट्या प्रकरणात हात असल्याशिवाय असले खोटे काम करणे शकच नाही. अश्या प्रकारचे खोटे काम करणाऱ्या कर्तव्यात कसूर व शासनाच्या पैशाचा अपहार करणाऱ्या मग तो तलाठी ,ग्रामसेवक, तहसील कार्यालयातील डाटाएन्ट्री ऑपरेटर,तहसीलदार, नायब तहसीलदार तसेच शेती नसताना खात्यावर नुकसान भरपाई रक्कम वर्ग करणारा शेतकरी हा गुन्ह्यास पात्र आहे.पूरग्रस्त नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन मदतीपासून वंचित शेतकरी या आमरण उपोषणस बसलेले आहेत
▪️काय आहेत मागण्या?
शासनाच्या पैशाचा अपहार केल्या बद्दल व आपल्या कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे.
पीकविमा कंपनीने नाकारलेल्या शेतकऱ्यांच्या तक्रारी ग्राह्य धरून सरसकट पीक विमा द्यावा.
महापुरात ज्या शेतकऱ्यांचे घरे वाहून गेले अथवा घरे कोसळले असतील त्यांना मदत व विनानिकष घरकुल मंजूर करा.ज्या शेतकऱ्यांक्या नांवावर शेती नाही परंतु नुकसान भरपाई त्यांच्या खात्यात आली आहे अश्या खोट्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करून दिलेल्या रकमा परत घ्या. पात्र लाभार्थ्यांना तात्काळ मदत निधी देण्यात यावा
कृषी पंपांना ५०% वीज बिल माफ करा.टपरीधारक व्यावसायिकांना वीणानिकष नुकसान भरपाई द्या.