spot_img
spot_img

पेनटाकळी धरणाच्या पाण्याला तिरंगी साज! -तिरंगी जलधारा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) गेल्या काही दिवसांपासून स्वातंत्र्य दिनाचा सर्वत्र जल्लोष सुरू आहे.अशात 13 ऑगस्ट पासून पेनटाकळी धरण तिरंगी रोषणाईने उजळून निघाले आहे. धरणाच्या सांडव्यावर लेझरच्या माध्यमातून तिरंगी प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. धरणाच्‍या या तिरंगी जलधारा पाहण्यासाठी सायंकाळी परिसरातील पर्यटकांची गर्दी उसळली.

अभियंता सोळंके यांच्या निर्देशानुसार मेहकर तालुक्यातील पेनटाकळी धरणावर ‘हर घर तिरंगा अभियान’ डेकोरेशन लेझर शो चे 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान करण्यात आले आहे.पेनटाकळी धरण तिरंगी रोषणाईने उजळून निघाले आहे. धरणाच्या सांडव्यावर लेझरच्या माध्यमातून तिरंगी प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. धरणातील दरवाजांमधून पडणारे पाणी, त्‍याच्‍या तिरंगी छटा आणि अंगावर येणारे तुषार पर्यटकांसाठी पर्वणी ठरली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!