spot_img
spot_img

आ.डॉ.संजय कुटेंनी रुग्णवाहिका स्वतःच्या जिनिंग मध्ये आणून ठेवल्या… आणि आता निवडणुकीच्या तोंडावर ते बाहेर काढून रुग्णसेवा करणार?

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) विधानसभा निवडणूक जवळ आली आणि एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू झालेत.शेतकरी नेते प्रशांत डीक्कर यांनी आमदार संजय कुटे वर फेसबुक अकाउंट वरून खळबळजनक आरोप केला.आधीच रुग्णवाहिका स्वतःच्या जिनिंग मध्ये आणून ठेवल्या आणि आता निवडणुकीच्या तोंडावर ते बाहेर काढून रुग्णसेवा करणार आहेत..असा टोला डिक्करांनी लगावला आहे.

२४ मार्च २०२२ मध्ये आमदार संजय कुटे यांनी शासकीय फंडातून ॲम्बुलन्सची खरेदी केली होती, पण जवळपास २ वर्षे या ॲम्ब्युलन्स त्यांनी स्वतःच्या मालकीच्या श्री कोटेक्स जिनींगमधे मध्ये लावून ठेवल्या आहेत. आता निवडणूकीच्या तोंडावर या ॲम्ब्युलन्स जनतेसाठी उपलब्ध करणार आहे. ही आहे का यांची रुग्णसेवा ? जी त्यांच्या फायद्यासाठी ऐन निवडणूकीच्या तोंडावर चालू होते आणि जेव्हा सामान्य लोकांना गरज असते तेव्हा हे स्वतःच्या घरात लपवून ठेवतात.

विशेष म्हणजे हे आमदार स्वतः डॉक्टर आहेत, आमदार म्हणून तर हे कृत्य चुकीचंच आहे, परंतू स्वतः डॉक्टर असून हे कृत्य डॉक्टरी पेशाला काळिमा फासणारे आहे. आम्ही या कृतीचा जाहीर निषेध करतो असेही डिक्कर म्हणाले

एकीकडे मतदारसंघात ॲम्ब्युलन्स विना लोकांचा जीव जात असताना केवळ निवडणूकीच्या तोंडावर राजकीय स्टंट करण्यासाठी ॲम्ब्युलन्स स्वतःच्या मालकीच्या ठिकाणी लावण्याचं पाप आमदार कुटे यांनी केले आहे. त्यांच्या पापांचा घडा भरला असून आगामी विधानसभा निवडणुकीत जनताच त्यांना उत्तर देईल असे प्रशांत डिक्कर म्हणाले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!