बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिल्हा मुख्यालयातील बस स्थानक व्यवस्थापनाचा गेल्या काही दिवसापासून तालतंबोरा बिघडला आहे. बस फेऱ्या अभावी प्रवाशांची फरपट सुरू आहे.आज सायंकाळी 5 वाजता पासून खामगावकडे जाण्याकरिता रात्री 8 वाजेपर्यंत एकही बस उपलब्ध झाली नसल्याने तब्बल 200 ते 300 पुरुष महिला प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.
बुलढाणा बस स्थानकात अनेक गैर कारभार चालतात.येथील भंगार साहित्य असो की डिझेल कोण कसे चोरी करतो आणि व्यवस्थापनाला कसे बाटलीत भरतो?हे कळायला मार्ग नाही. याबाबत परिवहन ला कोणतेच गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. बुलढाणा बस स्थानकावरून शेकडो बस धावतात.परंतु अलीकडे बस फेऱ्या कमी होऊ लागल्या आहेत.विशेष म्हणजे यामध्ये अनेक बसेसचे आयुर्मान संपले आहे.त्यामुळे रस्त्यात बसेस बंद पडण्याचे प्रकार वाढले.आज सायंकाळी पाच वाजता पासून खामगाव कडे जाणारी एकही बस वेळेवर आली नाही.त्यामुळे तब्बल 300 प्रवासी ताटकळत उभे राहिले.यामध्ये महिलांचे प्रमाण अधिक होते.शासनाने विविध योजना जाहीर केल्या.मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, बांधकाम कामगार योजना, विश्वकर्मा योजना, अशा योजनांचे फॉर्म भरण्याकरिता महिलांची बुलढाण्यात मोठी गर्दी होत आहे. महिला सकाळपासून बुलढाण्यात दाखल होतात. परंतु त्यांना जाण्यासाठी सायंकाळ होते. मात्र त्यांना बसेस उपलब्ध होत नाही.बस स्थानकावरील चौकशी विभागात उडवा उडवीची उत्तरे दिली जातात.सध्या हा कारभार पवार साहेब पाहतात..परंतु ते नेहमीप्रमाणे आपला मोबाईल स्विच ऑफ करून ठेवत असल्याचे प्रवासी सांगत आहेत.
▪️प्रवासी काय म्हणाले?
आम्ही सकाळी शासकीय योजनेचा लाभ मिळावा म्हणून विश्वकर्मा योजनेचा फॉर्म मिळण्याकरिता खामगाव वरून बुलढाण्यात आलो.परंतु पाच वाजता पासून खामगाव कडे जाणारी एकही बस उपलब्ध झाली नाही. -अलका मोरे, खामगाव
▪️निलंबनाची कारवाई करा
मी कोर्टाच्या कामानिमित्त बुलढाणा सकाळी आलो होतो.परंतु सायंकाळचे पाच नंतरही एकही गावाकडे जाणारी बस नाही.संबंधित अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देतात.तब्बल दोनशे ते तीनशे प्रवासी येथे बस ची वाट पाहत आहेत.बस उपलब्ध करण्याची विनंती केल्यावरही बस उपलब्ध करून देण्यात आली नाही.अखेर आठ वाजता च्या नंतर नेहमीच जाणाऱ्या दोन बसेस आल्या.प्रवाशांची गैरसोय करणाऱ्या या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे. – ॲड जोशी खामगाव