मेहकर (हॅलो बुलढाणा) मेहकर येथील मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींना रक्षाबंधनापूर्वी 187 कोटी 13 लाख रुपये मिळणार असल्याची माहिती तहसील कार्यालयातील एका बैठकीत देण्यात आली.
मेहकर व लोणार मतदारसंघातील हजारो महिलांनी या योजनेमध्ये सहभाग घेऊन आपले अर्ज भरले आहेत.अर्ज भरत असताना काही अर्ज नामंजूर झाले आहेत तर काही अर्ज तांत्रिक अडचणीमुळे थांबून ठेवले आहेत ही तांत्रिक अडचण दूर झाली की उर्वरित महिलांना सुद्धा रक्कम मिळणार आहे. मेहकर मतदारसंघातील एकूण 42 हजार 154 लाडक्या बहिणी योजनेचे अर्ज आले होते यापैकी 668 अर्ज काही तांत्रिक अडचणीमुळे राखून ठेवले आहेत तर 138 महिलांना इतर शासकीय लाभ मिळतो म्हणून त्यांचे अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत तर लोणार मतदारसंघात 25 हजार 611 अर्ज आले होते त्यापैकी 25 हजार 588 अर्ज मंजूर करण्यात आले आहेत तर 861 अर्ज काही तांत्रिक अडचणीमुळे राखून ठेवण्यात आले आहेत 127 महिलांना इतर लाभ मिळतो म्हणून ते अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत मंजूर झालेल्या सर्व महिलांना रक्षाबंधनाच्या अगोदर 187 कोटी 13 लाख रुपये मिळणार आहेत. असे तहसील येथील बैठकीत सांगण्यात आले.
यावेळी
शिवसेना तालुकाप्रमुख सुरेश तात्या वाळूकर, भास्करराव राऊत नगरसेवक रामेश्वर भिसे, मा. जितुभाऊ सावजी, रविराज रहाटे हर्षल गायकवाड, तहसीलदार निलेश मडके,भुषण पाटील,कापरे, काळे व पत्रकार बांधव उपस्थित होते.