बुलढाणा (हॅलो बुलढाणा) हंबरुनी वासराला चाटताना प्रत्येकांनी गाय बघितली असेल!त्यातील अनेकांनी वात्सल्य देखील टिपले असेल!कारण गाय आणि तिचे वासरू हे निर्व्याज प्रेमाचे प्रतीक मानले जाते. गाय वासरावर जे प्रेम करते, ते अनन्यसाधारण असते. म्हणून संतमंडळी नेहमी गाय-वासराच्या प्रेमाची उपमा देतात.परंतु बुलढाणा येथील अरास ले-आउट येथील रमेश लक्ष्मण वाघ यांच्या मालकीची गाय 7 ऑगस्ट पासून बेपत्ता झाली आहे.परिणामी दूध पित्या वासराने आई येण्याच्या वाटेवर डोळे अंथरलेले आहे.
रमेश लक्ष्मण वाघ यांनी पाळलेली गाय आणि वासरू ते मोठ्या प्रेमाने वागवत होते. वासरू तसे खट्याळ! इतरत्र उड्या मारणारे हे वासरू इकडे तिकडे फिरत असे तेव्हा आई या वासराकडेचारा खाण्यापूरती दुर्लक्ष करायची पण त्याच्या दूध पाजायच्या वेळी ती बरोब्बर येत होती.जगामध्ये आईसारखं प्रेम कोणी करू शकत म्हणूनच तर म्हटल्या जात असावे!असो!!महत्त्वाचा मुद्दा असा की, आपल्याला फोटो मध्ये दिसत असलेली गाय व वासरू हे बुलढाणा येथील रमेश लक्ष्मण वाघ रा.अरास ले आऊट,बुलढाणा यांच्या मालकीची असून सदर वासरू हे दूध पिते आहे. सदर गाय ही दिनांक 7 ऑगस्ट 2024 सायंकाळ पासून हरवली आहे.फोटोतील हे वासरू आईची वाट बघत आहे. ज्यांना कुणाला ही गाय कोठे आढळली तर श्री.वाघ साहेब मो.नं.8308319756 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले आहे.गाय शोधणाऱ्याला पाच हजार रुपयांचे रोख बक्षीस सुद्धा देण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.