चिखली (हॅलो बुलढाणा/ संतोष बाहेकर) येथून जवळच असलेल्या किन्होळा ते डोंगर खंडाळा रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य वाहनचालकासाठी डोकेदुखी ठरत आहे. गेल्या एक वर्षापासून सुरू असलेल्या रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असल्यामुळे नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.
डोंगरखंडाळा व किन्होळा ही चांगली बाजारपेठ आहे. नागरिक किन्होळा ते डोंगर खंडाळा बाजारासाठी जातात. सदर रस्त्यावर दळणवळणाची साधने चालतात व शैक्षणिक क्षेत्रात अतिशय चांगले सहकार विद्या मंदिर डोंगर खंडाळा येथे किन्होळा येथील अंदाजे तीनशे ते साडेतीनशे विद्यार्थी डोंगर खंडाळा येथे जातात. विद्यार्थ्यांची स्कूल बस अनेकदा या चिखलात रुतली आहे. सतत संतधार पावसामुळे रस्त्यावर चिखल होते व दुचाकी वाहन व चार चाकी वाहन घसरून अपघात होतात. संबंधित विभागाने या रस्त्याकडे लक्ष वेधून उत्कृष्ट दर्जाचा रस्ता बनवावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.










