डोणगाव (हॅलो बुलढाणा /गणेश टाकतोडे) राष्ट्रीय महामार्ग नागपूर -मुंबई हा रस्ता डोणगाव मधून गेला आहे. या रस्त्याच्या मधोमध भला मोठा खड्डा पडला आहे. श्री स्वामी समर्थ अर्बन च्या समोर पुलाजवळ खड्डा पडला असून तोअपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे.
रस्ते हे विकासाच्या वाहिन्या असतात.परंतु या महामार्गाची देखील चाळण झाल्याचे दिसून येते.महामार्गावर अनेक ठिकाणी लहान मोठे खड्डे आहेत.श्री स्वामी समर्थ अर्बन च्या समोर पुलाजवळचा खड्डा तर जीव घेणा ठरत आहे. सदर खड्डा हा तात्पुरता एकदा भरण्यात आला होता परंतु रस्त्याची वर्दळ पाहता खड्डा उखडून मोठा झाला आहे. खड्ड्यामध्ये पावसाचे पाणी साचल्यास खड्डा दिसत नाही. परिणामी अपघाताचा धोका संभावतो.सार्वजनिक विभाग यांना नरबळी हवा का? असा संतप्त सवाल विचारला जात आहे.










