बुलडाणा (हॅलो बुलढाणा) देशातून हत्तीरोग निर्मूलनाच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जात आहे या रोगाला प्रतिबंध करण्याच्या दृष्टिकोनातून हत्तीरोग प्रतिबंधात्मक गोळ्यांच सेवन बाधित क्षेत्रातील व्यक्तींनी करा असं आवाहन केंद्रीय आयुष व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज केले.
हत्तीरोगाच्या दुरीकरणासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहीमेचे उद्घाटन लॉन्च इव्हेंट दूरदृष्य प्रणालीद्वारे आज 10 ऑगस्टला मेहकर येथील महाराष्ट्र अर्बन बँकेच्या सभागृहात
केंद्रीय आयुष व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते झाले .या शुभारंभ कार्यक्रमात केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या सचिव श्रीमती वंदना मॅडम ,बिहार ,झारखं ड , उडीसा , कर्नाटक , तेलंगणा , उत्तर प्रदेश , या राज्याचे आरोग्यमंत्री तसेच ग्रामविकास , कृषी महिला व बाल कल्याण, शिक्षण , अल्पसंख्यांक मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी बैठकीत सहभागी झाले होते . त्यावेळी मार्गदर्शन करताना मंत्री महोदय बोलत होते ती पुढे म्हणाले हत्तीरोग हा आजार कायमस्वरूपी असल्याने त्यांना 45 टक्के अपंगत्वाचे प्रमाणपत्र द्यावे जेणेकरून त्यांना अपंगत्वाचे इतर लाभ सुद्धा मिळू शकतील .. त्या दृष्टिकोनातून पहिलं 45% अपंगत्वाचे प्रमाणपत्र बुलढाणा येथे मंत्री महोदयांच्या हस्ते संबंधित हातीरोगग्रस्त महिलेला आज देण्यात आल . भारतातील 20 राज्य आणि केद्र शासित प्रदेशातील 7.5 रुग्ण या लिम्फैटिक फाइलेरियासिस अर्थात हत्तीरोग आजाराने व्यथित आहेत या आजाराचे देशातून निर्मूलन करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केल्या जात आहे 2023 पासून केंद्र सरकारच्या वतीने पंचमुखी रणनीती योजना सुरू करण्यात आली आहे योजनेअंतर्गत या रोगाचा प्रसार थांबण्यासाठी प्रतिबंधात्मक गोळी ही फेब्रुवारी आणि ऑगस्ट महिन्यात बाधित क्षेत्रात मोहीम स्वरूपात नागरिकांना देण्यात येते 2023 मध्ये या अभियानाला चांगला प्रतिसाद लोकांनी दिला जवळपास 82 टक्के लोकांपर्यंत हे अभियान पोचलो होतो तर यावर्षी एमडीए अभियानाच्या पहिल्याच चरणामध्ये 11 राज्यातील 96% जिल्ह्यातील 95 टक्के लाभार्थ्यांपर्यंत या प्रतिबंधात्मक गोळ्यांच वाटप करण्यात आले आहे भविष्यात हत्तीरोगापासून वाचण्यासाठी प्रतिबंधात्मक गोळ्यांचं सेवन बाधीत क्षेत्रातील प्रत्येकानी करावं असं आवाहन त्यांनी केले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्व आणि केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याणमंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या मार्गदर्शनात भारत चिकित्सा सेवा ही सर्वच क्षेत्रांमध्ये मार्गक्रमण करतआहे 2047 ला भारताला विकसित राष्ट्राचा दर्जा प्राप्त करून देण्याचा संकल्प आपण सर्वांनी मिळून करूया असेही ते म्हणाले केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव पुढे म्हणाले की महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी दाखवलेल्या मार्गावर काम करत आहे सरकारच्या माध्यमातून महिला युवक शेतकरी गोरगरीब यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ दिला जात आहे . मच्छरांच्या दंशनाने हत्तीरोग होत असल्याने मच्छरदाणी सारखा बचात्मक संसाधनाचा उपयोग संदर्भात सरकारच्या वतीने सकारात्मक भूमिका घेतलेल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.










