बुलढाणा (हॅलो बुलढाणा) पावसाच्या लहरीपणामुळे चिंताक्रांत झालेल्या सव्वालाख बुलढाणा शहर व परिसरवासियांचे मोठे ‘टेन्शन’ काही प्रमाणात दूर झाले आहे. येळगाव धरणात 50 टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे.
कालपासून पावसाची रिपीरीप सुरू आहे.गेल्या काही दिवसापासून देखील येळगाव धरणात थेंबे थेंबे तळे साचत आहे.आता मात्र येळगाव धरणाची जल पातळी 50 टक्क्यांवर आली आहे. बुलढाणा चिखली राज्यमार्गावर असलेल्या येळगाव धरणावरून बुलढाणा शहरासह पंचक्रोशीतील गावांना पाणी पुरवठा करण्यात येतो. धरणातील साठा कमी असल्यामुळे सव्वा लाख नागरिकांसह प्रशासनाची डोकेदुखी वाढली होती. मात्र काल आणि काही दिवस पूर्वी या क्षेत्रात झालेल्या रिमझिम पावसात येळगाव धरणात जवळपास 50% जलसाठा उपलब्ध झाल्याची सुखद वार्ता आहे.