3.6 C
New York
Friday, November 22, 2024

Buy now

spot_img
spot_img

पत्रकारांनी ‘अपडेट’ होऊन दिशादर्शक व्हावे! -भाईजींची वृत्तगौरव पुरस्कार सोहळ्यात मार्गदर्शक सूचना..

बुलडाणा (हॅलो बुलढाणा) पत्रकारितेत अनेक आव्हाने येतात परंतु पत्रकारांनी काळानुरूप अपडेट होऊन समाजाचे दिशादर्शक व्हावे,असे आवाहन राधेश्याम चांडक उर्फ भाईजी यांनी केले.

पुढे भाईजी म्हणाले की, सामाजिक,राजकीय विषयासोबत,राज्य,देश,व आंतरराष्ट्रीय विषयाचा सखोल अभ्यास व जागतिक संवादाचे माध्यम भाषांचे ज्ञान मिळविल्यास पत्रकारितेचा दर्जा सुधारण्यास मदत होईल.आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांच जसे तीन वर्षातून प्रशिक्षण होते, पडताळणी होते. त्याच पद्धतीने पत्रकार बांधवांसाठी नवनवीन ज्ञान देणाऱ्या प्रशिक्षणाची गरज पूर्ण केल्यास परिणामकारक पत्रकारिता करणे अजून चांगल्या पद्धतीने शक्य होईल. जे पत्रकार समाजाभिमुख कार्य करतात त्यांचा गुणगौरव देखील गरजेचा असल्याचे प्रतिपादन
बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक ऊर्फ भाईजी यांनी केले.
मानस फाउंडेशन च्या वतीने ९ ऑगस्ट रोजी वृत्तगौरव पुरस्कार देऊन पत्रकार रणजीत सिंग राजपूत, संदीप वानखेडे, कैलास राऊत, व शौकत शहा यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. पत्रकार भवन बुलढाणा या ठिकाणी पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसाई परिवारचे अध्यक्ष डॉ.वसंतराव चिंचोले होते. तर बुलढाणा अर्बन सर्वेसर्व राधेश्याम चांडक, व्हाईस ऑफ मीडियाचे राज्याध्यक्ष पत्रकार अनिल मस्के , मराठी पत्रकार परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र काळे आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना भाईजी म्हणाले पत्रकारिता हे खूप मोठे माध्यम आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकारांना म्हटले जाते. त्यामुळे पत्रकारांची जबाबदारी ही मोठी आहे. पत्रकारांना समाजामध्ये मानसन्मान दिल्या जातो. त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा एक अभ्यासू आणि वैचारिक व्यक्तिमत्व असाच असतो. त्यामुळे पत्रकारांनी नवनवीन ज्ञान संपादन केले पाहिजे. जागतिक भाषांचा अभ्यास करून परिसरापुरते मर्यादित न राहता स्वतःला अद्यावत केले पाहिजे. काही पत्रकार पत्रकारितेच्या पलीकडे जाऊन सामाजिक कार्य करतात ही मोठी गोष्ट आहे. अशा पत्रकारांचा गुणगौरव करणे हे सामाजिक जाणीवेतून महत्त्वाची आहे असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी पत्रकारा विषयी काही अपेक्षाही व्यक्त केल्या.

मानस फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. डी एस लहाने म्हणालेत..

मानस फाउंडेशन करीत असलेले कार्य आज राज्यस्तरीय झाले आहे. बुलढाणा शहरातून सुरुवात झालेल्या या रोपट्याचे मोठ्या वृक्षामध्ये रूपांतर करण्यासाठी लोकशाहीचा चौथा स्तंभ, पत्रकारांची भूमिका मौलिक असल्याचे सांगून त्यांनी पुरस्कार प्राप्त पत्रकार बांधवांचे अभिनंदन केले. तसेच मानस फाउंडेशनच्या वतीने आगामी काळात विधवा भगिनींसाठी राज्यस्तरीय मेळावा बुलढाण्यात आयोजित करण्याचा संकल्प केला. या संकल्पनेला चांडक यांनीही दुजोरा देत शक्य ती मदत देण्याचे आश्वासन दिले. पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष राजेंद्र काळे यांनी पुरस्कार प्राप्त मान्यवरांची माहिती दिली. तर राजेश देशमाने यांनी बुलढाण्याच्या पत्रकारितेच्या प्रवासावर नजर टाकली. पत्रकार गणेश निकम यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाची भूमिका मांडली व पुढे सत्काराला उत्तर देताना पत्रकार रणजीत सिंग राजपूत यांनी मानस फाउंडेशनच्या कार्याचे ऋण व्यक्त केले तसेच …
कार्यक्रमासाठी मानस फाउंडेशनच्या अनिता कापरे, प्रतिभा भुतेकर ,सुरेखा सावळे ,प्रज्ञा लांजेवार ,मनीषा वारे ,ज्योती पाटील, एडवोकेट संदीप जाधव ,पंजाबराव गवइ ,गौरव देशमुख, कडूबा सोनवणे, दिनकर पांडे, गजानन मुळे ,किरण पाटील ,आदींनी परिश्रम घेतले.सूत्र संचालन मनीषा वारे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.शहीणा पठाण यांनी मानले.
कार्यक्रमास पत्रकार बांधव व प्रतिष्ठित नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!