spot_img
spot_img

भुमिपुत्रांची आरोग्य सेवा श्री गजानना चरणीं! -भक्तांच्या सेवेसाठी लासुरा येथे उभारला विशेष वैद्यकीय सेवा व मदत कक्ष!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) संत गजानन महाराजांच्या पालखीसोबत पायी चालणाऱ्या लाखो भक्त गणांच्या आरोग्य सुविधेसाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या संकल्पनेतून लासुरा फाटा येथे विशेष वैद्यकीय सेवा आणि मदत कक्ष उभारण्यात आला आहे.

पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शनसाठी गेलेली संत गजानन महाराजांची पालखी आषाढी एकादशीचा सोहळा आटपून पुन्हा शेगावच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे तब्बल 61 दिवसाचा पायी प्रवास आटपून ही पालखी दहा ऑगस्टला खामगाव नगरीमध्ये पोहणार असून पालखीचा शेवटचा मुक्काम ही खामगाव येथे होणार आहे त्यानंतर 11 ऑगष्टच्या सकाळीच ही पालखी शेगावच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे या पालखी सोबत खामगाव ते शेगाव असा पायी प्रवास बुलढाणा जिल्ह्यातील लाखो भक्त गण करत असतात 18 किलोमीटरच्या या पायी दिंडी प्रवासामध्ये लहानांपासून तर थोरांपर्यंत श्री चे भक्तगण या शेवट्या पालखी प्रवासात सहभागी होतात आरोग्यसेवा हीच ईश्वरसेवा समजुन भक्तगणांच्या आरोग्य सुविधेसाठी केंद्रीय आरोग्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या संकल्पनेतून विशेष वैद्यकीय सेवा आणि मदत कक्ष लासुरा फाटा येथे उभारण्यात आला आहे या मदत कक्षेत दोन रुग्णवाहिका डॉक्टर्स, नर्सेस यांचा पुरेसा स्टॉप आणि औषधी साठा कक्षेत ठेवण्यात आला आहे .. पायी चालणाऱ्या श्रीच्या भक्तगणांना काही त्रास जाणवल्यास वैद्यकीय मदत कक्षेची मदत घ्या असे आवाहन रुग्णालय प्रशासन आणि भुमीपुत्र वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने करण्यात आले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!