देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा) विणकारांनी भारतातील वस्त्रंच नाही तर संस्कृती विणली आहे. हातमागावरील धागे हे आपल्या संस्कृतीशी आपल्याला जोडतात! असे प्रतिपादन सौ स्मिताताई चेकेटकर त्यांनी व्यक्त केले.
7 ऑगस्ट हातमाग दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होत्या. भारताचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या संकल्पनेनुसार तसेच भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष सौ चित्रताई वाघ यांच्या सूचनेनुसार महिला मोर्चा बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने आमदार सौ श्वेताताई महाले पाटील,जिल्हाध्यक्ष गणेश मान्टे यांच्या मार्गदर्शनात
महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष सौ स्मिताताई चेकेटकर यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर शिल्पा कायंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वामी सुखानंद मठ येथे हातमाग दिनाच्या निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मोदी यांनी 7 ऑगस्ट 2015 पासून हातमाग दिवस साजरा करण्याचे का ठरवले याबाबतही स्मिताताई यांनी सविस्तर माहिती देत मोदीजींचे व्हिजन किती व्यापक आहे, हे यावेळी समजावून सांगितले.
भाजपा महिला मोर्चा सरचिटणीस सविता ताई पाटील तसेच विद्याताई भगत यांची हातमाग दिनानिमित्त कार्यक्रमासाठी अनुक्रमे संयोजक व सहसंयोजक म्हणून निवड करण्यात आली होती. देऊळगाव राजा येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमांमध्ये विणकर समाजातील महिला भगिनी तसेच भाजपा महिला मोर्चा पदाधिकारी मोठ्या प्रमाणात हातमागावरील विणलेल्या पैठणी नेसून सहभागी झाल्या होत्या. यावेळी एक छोट्याशा रॅम्प वॉक फॅशन शो चे आयोजन सुद्धा करण्यात आले.