मेहकर (हॅलो बुलढाणा/संतोष अवसरमोल) आरोग्य सेवा ही मूलभूत गरज!परंतु डिजिटल युगातही अनेक ग्रामीण भाग आरोग्य सेवेपासून वंचित आहेत.लोकप्रति निधी केवळ विकासाच्या बाता करतात मात्र परिस्थिती काही औरच असते.मेहकर तालुक्यातील घाटबोरी येथील आयुर्वेदिक आरोग्य दवाखान्याचे असेच विदारक चित्र समोर आले आहे.आयुर्वेदिक दवाखाना बंद असल्याने कचऱ्याच्या ढिगार्यावर झोपून वडाच्या झाडाला टांगलेली सलाईन घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.कदाचित हे प्रतिकात्मक आंदोलन असेल,परंतु लोकप्रतिनिधींनी यातून धडा घेणे गरजेचे आहे.
बुलढाणा जिल्हातील मेहकर तालुक्यातील घाटबोरी गावातील आयुर्वेदिक आरोग्य दवाखाना नावालाच असून
गेल्या पाच वर्षापासुन वैधकीय डॉक्टरांची रुग्ण सेवा ही कागदावर दिसत आहे. येथील आयुर्वेदिक आरोग्य दवाखान्याची इमारत मोडकळीस आली आहे. परिसरात घाण कचऱ्यांचे ढिगारे साचलेले आहेत.गाव तापीने फणफणात आहे.अनेक रोगराईंचा शिरकाव वाढला आहे.त्यामुळे गावातील अंकुश श्रीराम राठोड, शंकर श्यामराव गिरी, राजु तुकाराम कुसळकर, यांनी आयुर्वैदिक आरोग्य दवाखाना बंद असल्याने घाण कचऱ्यांचे ढिगाऱ्यावर बसुन सलाईन घेतले आहे. आणि संबंधित प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आहे.या अनोख्या आंदोलनाची दखल आयुष मंत्री प्रतापराव जाधव घेणार आहेत का असा प्रश्न जिल्हाभरात चर्चिला जात आहे.










