spot_img
spot_img

येडा समजलात का? 2018 ची अजून कर्जमाफी नाही! -त्यांचा निवडणुकीवर डोळा आणि शेतकरी भोळा?

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिल्ह्यातील आमदारांनी कृषिमंत्र्यांच्या बंगल्यावर बैठक घेऊन 31 ऑगस्ट पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा होणार असल्याचे आश्वासित केले.परंतु सरकारच्या या घोषणेवर विश्वास तरी कुणी ठेवावा?असा प्रश्न विधानसभा निवडणूक तोंडावर येत असताना अनेकांना पडला आहे.त्याचे पुरावे देखील अनेकांनी जवळ ठेवले आहे.देवपूर येथील एका शेतकऱ्याला तर 2018 यावर्षी कर्जमाफी झाली होती.बँकेमध्ये लिस्ट लागली ग्रामपंचायत मध्येही यादी लागली होती परंतु अजूनही त्यांचे कर्ज माफ झालेले नाही.त्यामुळे सरकारचा शब्द केवळ निवडणुकीपुरता असल्याच्या संताप्त प्रतिक्रिया उमटत आहे.

तुळशीराम हरी नरोटे राहणार देवपूर दुधा तालुका बुलढाणा जिल्हा बुलढाणा या शेतकऱ्यांचे सेंट्रल बँक ऑफ इंडिया बुलढाणा येथे बँक खाते आहे.त्यांना 2018 मध्ये कर्ज माफ झाले म्हणून बँकेने यादीमध्ये त्यांचे नाव टाकले.ही यादी ग्रामपंचायत कार्यालयात सुद्धा लागली होती.परंतु 2024 वर्ष सुरू असले तरी अजूनही त्यांची कर्जमाफी झालेली नाही.त्यांच्यासा रखे अनेक लाभार्थी बँकेचे उंबरठे अजूनही झिजवत आहेत.
नुकतेच जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत कृषी मंत्र्यांनी बैठक घेतली. ३१ ऑगस्ट पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पिकविमा जमा करणार असल्याचे सरकारने सांगितले. पण रविकांत तुपकर यांनी सरकारच्या या घोषणेवर जोरदार प्रहार केला असून “यांच्या तारखांवर विश्वास ठेवू नका, याआधी त्यांनी अनेकदा तारखा दिल्या, त्याच्या बातम्या पेपर मध्ये छापून आणल्या” असे म्हणत तुपकर यांनी जुन्या बातम्यांची कात्रणे दाखवली. लबाडा घरचे आवतन जेवल्याशिवाय खरे नाही, आता शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरून आंदोलनाचा पवित्रा घेतल्याशिवाय पर्याय नाही. जे लोकप्रतिनिधी बैठकीत होते,तेच सत्तेत आहेत..मग आतापर्यंत पिकविमा का जमा झाला नाही? असा खडा सवाल करीत विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर असल्याने सत्ताधारी नेत्यांना पिकविम्याचा पुळका आल्याचा घणाघात रविकांत तुपकर यांनी केला.रविकांत तुपकर यांचीही शब्द खरे असावेत,असे शेतकऱ्यांना वाटत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!