मलकापूर (हॅलो बुलढाणा/रवींद्र गव्हाळे) भाजपाचे उपसरपंच खरंच मुजोर झालेत का हो?हा प्रश्न विचारण्याचे कारण की, एका भाजपाच्या उपसरपंचाने चक्क शिवसेना उबाठा शहर प्रमुखाला जीवे मारण्याची धमकी दिली आल्याची बाब समोर आली आहे.
याप्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.नाली साठी खोदलेला सिमेंट काॅक्रिटचा रस्ता सपाटीकरणाची गजानन ठोसर यांनी मागणी केली होती. दरम्यान सपाटीकरणाची मागणी केल्याने पित्त खवळलेल्या उपसरपंचाने हातात तलवार, लाठ्याकाठ्या, पाईप,दगड घेऊन ठोसर यांच्या घरावर तिघा समर्थकांसह चाल केली.याप्रकरणी शहर पो.स्टेशनला उपसरपंच शैलेंद्रसिंह राजपूत याच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खोदलेला सिमेंट रस्त्या चे सपाटीकरण न केल्यास रहिवासी “खोदलेल्या रस्त्यावरच 15 ऑगस्ट 24 रोजी आमरण उपोषण”करणार असल्याचा इशारा देण्यात आला होता.त्यामुळे उपसरपंचाचे पित्त खवळले.मलकापुर शहरालगत असलेल्या वाकोडी ग्रामपंचायत हद्दीतील आदर्श नगर मधील श्री संत गजानन महाराजांच्या मंदिरासमोरील नाली करण्यासाठी एक वर्षापूर्वी उपसरपंच शैलेंद्रसिंह राजपूत यांनी सिमेंट काॅक्रिटचा रस्ता खोदला, रस्ता खोदकाम करतांना खोदकामाच्या ठिकाणी सिमेंट काॅक्रिटचा माल टाकून रस्ता सपाटीकरण करून देण्याचे राजपूत यांनी स्थानिक रहिवाश्यांना सांगितले होते मात्र एक वर्ष उलटून सुद्धा रस्ता सपाटीकरण केला नसल्याने या रस्त्यावरुन ये-जा करतांना लहान मुले पडून अनेक अपघात झाले आहे गत सप्ताहात दोन वर्षीय नकुल ठोसर हा याच रस्त्यावर डोक्यावर पडला जख्मी झाला,त्याच्या डोक्याला मार लागल्याने डॉ.नी त्याचे डोक्याला सहा टाचे दिले.याबाबतची माहिती त्यावेळी हि राजपूत यांना दिली मात्र त्यांनी या कडे दुर्लक्ष केले बुधवार रोजी सायंकाळी शिवसेना शहरप्रमुख गजानन ठोसर यांनी भ्रमणध्वनीवरुन या खोदलेल्या रस्त्याचे सपाटीकरण न केल्यास “भिक मांगो आंदोलन करुन खोदलेला सिमेंट रस्त्याचे सपाटीकरण करु असा इशारा देताच उपसरपंच राजपूत यांचे पित्त खवळल्याने त्यांनी भ्रमणध्वनीवरच ठोसर यांना अश्लील भाषेत शिविगाळ सुरू केली.व आपल्या दोन -तिन समर्थकांसह हातात तलवार, लाठ्याकाठ्या,पाईप,दगडं घेऊन ठोसर यांच्या घरावर चाल केली महिलांनी अश्लील शिविगाळ करुन गदारोळ माजविला याबाबतची माहिती पत्नी यांनी भ्रमणध्वनीवर देताच गजानन ठोसर यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली, ठोसर यांच्या तक्रारीवरून शहर पोलीसांनी उपसरपंच शैलेंद्रसिंह राजपूत सह तिघांविरुद्ध अप.न.0384/24कलम 296,351(2),3(5) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
उपसरपंचाच्या गुंडशाहीला लोकशाही मार्गाने देणार उत्तर!
पाच दिवसांत खोदलेला सिमेंट रस्त्याचे सपाटीकरण न केल्यास रहिवासी ग्रामस्थ व महिला त्याच खोदलेल्या रस्त्यावरच स्वातंत्र्य दिनी 15 ऑगष्ट 24 गुरूवार रोजी आमरण उपोषणाला बसणार असल्याचे शिवसेना शहरप्रमुख गजानन ठोसर एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे कळविले आहे.