साखरखेर्डा (हॅलो बुलढाणा) आधी शेतात घाम गाळला..नंतर जोडधंदा म्हणून साखरखेर्डा येथे झेरॉक्सचे दुकान थाटले.दरम्यान कोरोनाने एन्ट्री केल्याने लॉकडाऊन मध्ये झेरॉक्सचे दुकानही बंद झाले.परंतु हार मानली नाही.पुणे गाठले अभ्यास केला आणि आज सोपान मनोहर पाटोळे पोलीस दलात पीएसआय झाला आहे.
शेतकरी कुटुंबातील अनेक आई-वडिल अल्प शिक्षित असतात. नातलगातही फारसे उच्च शिक्षित नसतातच. मात्र आई-वडिलांचे आपल्या मुलाला मोठा साहेब बनविण्याचे स्वप्न असते. त्यासाठी ते अपार कष्ट करीत असतात.वडगाव माळीयेथील सोपान मनोहर पाटोळेने जिद्द व चिकाटीच्या भरोशावर पीएसआय बनवून दाखविले.ग्रामस्थांनी सोपानची फुल आणि गुलाल उधळत मिरवणूक काढली.त्याने प्रतिकूल परिस्थितीत मिळविले यश हे प्रेरणादायी व देदिप्यमान म्हणावे लागेल!