देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा) एखाद्या ठिकाणी आग लागल्यावर मोठे वाहन त्या ठिकाणी जाऊ शकत नाही अशा ठिकाणी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आता राज्य शासनाने राज्यातील सर्वच नगरपरिषदेला दुचाकीवर (बुलेट)अग्निशमन यंत्रणा सज्ज केली आहे. आता गल्लीबोळात लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवता येणार आहे. ७ ऑगस्ट रोजी नगरपालिका प्रशासन संचलनालय मुंबई यांच्याकडून अत्याधुनिक दुचाकी वाहन नगरपरिषदेला प्राप्त झाले असून त्याचे विधिवत पूजन मुख्याधिकारी अरुण मोकळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रभारी आरोग्य निरीक्षक विशाल वाघ व इतर विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
याबाबत सविस्तर असे की राज्य शासनाकडून राज्यातील प्रत्येक नगरपरिषदेला अग्नि सुरक्षा अभियान योजनेअंतर्गत अद्ययावत अग्निशमन वाहन पुरविण्यात आले. त्यानंतर राज्य शासनाचे असे लक्षात आले की गल्लीबोळात एखाद्या वेळेस आग लागल्यास त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी त्या ठिकाणी मोठे वाहन पोहोचू शकत नाही त्यासाठी ३५० सीसीच्या दुचाकी (बुलेट)वर अध्ययावत असे अग्निशमन यंत्र बसवून त्याद्वारे गल्लीबोळात लागलेल्या आगीवर या दुचाकीद्वारे नियंत्रण मिळवता येईल त्यामुळे राज्य शासनाने राज्यातील प्रत्येक नगरपरिषदेस 24 किलो वाटर फोम ,दोन फायर सिलेंडर, फायर पंप 50 फूट, त्यावर जनरेटर सेट अशी अद्ययावत बुलेट दुचाकी तयार करून पाठवण्यात आली.










