बुलढाणा (हॅलो बुलढाणा/राजेंद्र घोराडे) काल मुंबई येथे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना प्रत्यक्ष भेटून आ. संजय कुटे,माजी मंत्री आ. राजेंद्र शिंगणे,तसेच इतर आमदार महोदयांनी झूम मिटिंग घेऊन बुलढाणा जिल्हा पिक विम्याची रक्कम तात्काळ जमा करण्याविषयी विनंती केली. शेतकरी मायबापाना त्यांच्या हक्काचे पैसे मिळत असतील तर अतिशय आंनदाची बाब आहे.जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व आमदार एकत्र येऊन काही विधायक करत असतील तर ही अभिमानास्पद गोष्ट आहे.
पण शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संपूर्ण जिल्हाभरात या विषयावर आंदोलन व मोर्चे काढल्यानंतर , सत्ताधारी आमदार झोपेतून जागे होत असतील, खुर्चीचे पाय हालायला लागल्यावर यांची शेतकऱ्याप्रती असलेली संवेदना जागृत होत असेल तर हे पूतना मावशीचे प्रेम नव्हे का? असा खडा सवाल शरदचंद्र पवार गटाच्या महिला कार्याध्यक्ष कु. गायत्री शिंगणे यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला मिळत असलेली प्रचंड लोकप्रियता पाहता,व पक्षाने जनतेचे प्रश्नासम्बन्धि आंदोलन सुरु केल्याने सत्ताधारी जनतेप्रती संवेदनशील होत आहेत,त्यामुळे आमदार महोदयांनी सुरु केलेला श्रेय घेण्याचा खेळ आता कामी येणार नाही.अशीही टिप्पणी गायत्री शिंगणे यांनी दिली.