बुलढाणा (हॅलो बुलढाणा) अस्मानी – सुलतानी संकटाच्या फेऱ्यात अडकलेल्या शेतकऱ्याला पिक विम्याची रक्कम मिळावी यासाठी
आज मुंबई येथे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर बुलढाणा जिल्ह्यासाठी विशेष बैठक पार पडली. झालेल्या Live बैठकीत पीक विम्यावर तोडगा निघाला. येत्या 31 तारखेला सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम 100 टक्के मिळणार आहे.
या बैठकीला जिल्ह्यातील आमदार आकाशदादा फुंडकर,आ. राजेंद्र शिंगणे, आ. संजय गायकवाड,केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, आ. संजय रायमूलकर, आ. संजय कुटे, श्वेतताई महाले उपस्थित होते.














