spot_img
spot_img

भारती भोसलेची ‘भरारी’ भारीच ! -पोलीस भरती परीक्षेत राज्यात अव्वल!

दुसरबीड (हॅलो बुलढाणा/प्रतिक सोनपसारे) इच्छा तिथे मार्ग सापडतो.केवळ इच्छा असून चालत नाही तर जिद्द चिकाटीला मेहनतीची जोड दिली तर यशाला गवसणी घालता येते.असेच यश दुसरबीडच्या जीवन विकास विद्यालयाची भारती भोसले हीने पोलीस भरती परीक्षेत राज्यात प्रथम येऊन पदरात पाडून घेतले.

दुसरबीड येथील जीवन विकास विद्यालयाची भारती कैलास भोसले हिने महिला पोलीस भरती परीक्षेत राज्यातून पहिला येण्याचा मान मिळवला आहे. यावेळी जीवन विकास विद्यालयाच्या वतीने तिचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. भारतीचे मूळ गाव ताडशिवनी असून तिचे 5 वी ते 10 वी पर्यंतचे शिक्षण जीवन विकास विद्यालयात पूर्ण झाले. मिरा भाईंदर येथे 1400 मुलींना मागे टाकत तिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. यावेळी प्राचार्य जी. व्ही. भांगे यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन तिचा सत्कार केला. उपप्राचार्य पी. डी गायके वडील कैलास भोसले जी. एस देशमुख प्राध्यापिका श्रीमती भोसले शिक्षिका पिंपरकर डी. जी राजे उपस्थित होते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!