मलकापूर (हॅलो बुलढाणा/रविंद्र गव्हाळे) मोरवाल हॉस्पिटल मधून एक धक्कादायक घटना समोर आली डॉक्टरांनी एका महिलेच्या डोळ्यातून चक्क 60 जिवंतअळ्या काढल्या आहेत.
चिखली येथील मोरवाल हॉस्पिटलचे संचालक यांनी या महिलेचा डोळा वाचवला आहे. या महिलेच्या डोळ्यातील अळ्या काढण्यासाठी तब्बल दोन तास लागल्याची माहिती मिळाली आहे.चिखली तालुक्यातील मालगणी येथील ज्योती गायकवाड या महिला रुग्णाच्या डोळ्यातून चक्क साठ जिवंतअळ्या काढण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. चिखली येथील प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर स्वप्नील मोरवाल यांनी या महिलेच्या डोळ्यातून अळ्या काढल्या आहेत या महिलेचा डोळा खराब होण्यापासून वाचवला आहे. अळ्या काढताना डॉक्टर यांना तब्बल दोन तासाचा वेळ लागला असून एकेएकअळी काढावी लागली. मोरवाल हॉस्पिटल मधील डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली आहे. विशेष म्हणजे या महिलेकडून आय सर्जरी डॉक्टर स्वप्नील मोरवल यांनी कुठली फी सुद्धा घेतलेली नाही.मोल मजुरी करणाऱ्या महिलेला शेतात काम करताना अचानक डोळ्यात मातीची खडा लागला होता तेव्हापासून डोळ्यात त्रास होता.जास्त त्रास वाढल्यावर या महिलेने डॉक्टर स्वप्नील यांच्याकडे तपासणी केली होती तेव्हा त्यांच्या डोळ्यात अळ्या झाल्याचे डॉक्टरांना समजले डॉक्टरने तात्काळ त्या अळ्या काढण्याचं ठरवलं. शस्त्रक्रिया दरम्यान पाहता पाहता डॉक्टरांनी तब्बल 60 जिवंतळ्या त्यांच्या डोळ्यातून काढल्या आता त्यांच्या डोळ्याना कोणताही त्रास नसून डोळा सुद्धा सुखरूप आहे त्यामुळे डॉक्टर मोरवाल यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. डोळा वरून चांगला दिसत होता परंतु आतून महिलेच्या डोळ्यात एकूण साठ अळ्या निघाल्याचे समोर आलं.










