spot_img
spot_img

भाजपाच्या पुढार्‍यांना खरंच माज आला आहे का? -पोलीस स्टेशनमध्ये महिलेला पुढार्‍याकडून मारहाण!

मलकापूर (हॅलो बुलढाणा) भाजपाच्या पुढार्‍यांना खरंच माज आला आहे का?कदाचित आला ही असेल..? भाजपाचे स्थानिक पुढारी मलकापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवा तायडे शहरातील पोलीस स्टेशनमध्येच महिलेला मारहाण करीत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.परंतु दुर्दैवाची बाब अशी की पोलिसही त्याच्या दिमतीला आहेत.विशेष म्हणजे हा व्हिडिओ सुषमा अंधारे यांनी व्हायरल केला आहे.या व्हिडिओची पुष्टी ‘हॅलो बुलढाणा’ करीत नाही.

सुषमा अंधारे यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये शिवा तायडे हे पोलीस स्टेशन मध्ये चक्क एका महिलेला मारहाण करीत असल्याचे दिसून येत आहे.मध्यस्थी गेलेल्या एका तरुणालाही ते मारायला कमी करत नाही.एक नव्हे तर तीन पोलीस वाल्यांना सुद्धा जुमानत नाहीत.त्यामुळे त्यांची दादागिरी चांगलीच दिसून येत आहे..या वादाचे नेमके कारण काय ते माहित नाही.मात्र एका महिलेला मारहाण करणे कितपत योग्य आहे?हा भाजपाचा माज आहे का?असे प्रश्न उपस्थित होत आहे.एकीकडे महिला सक्षमीकरणाच्या गोष्टी कराव्या आणि दुसरीकडे महिलांवर अत्याचार करावा हा कुठला न्याय आहे?असा प्रश्न विचारला जात आहे. सुषमा अंधाराने हा व्हिडिओ फेसबुक पोस्टवर व्हायरल केला असून यावर कारवाई होते का?की पोलीस मुग गिळून गप्प बसतात? की मोदींची जादू चालते?याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!