चिखली (हॅलो बुलढाणा) भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष सतीश दादा पवार यांच्या नेतृत्वात चिखली तालुक्यातील राहुल वानखेडे यांची भीम आर्मीच्या तालुकाअध्यक्षपदी
निवड करण्यात आली आहे. समाजातील संघटन आणि नवयुवकांना एकत्रित करण्याचे काम पक्ष वाढीसाठी जबाबदारी पूर्वक निष्ठेने कामाची तत्पर्यता न थांबता न थकता समाजकार्यासाठी एकनिष्ठेने काम करील अशी ग्वाही सतीश दादा पवार यांच्यापुढे यावेळी राहुल वानखेडे यांनी दिली. तसेच चिखली तालुक्यातील एकनिष्ठ कार्यकर्ता राहुल भाऊ साळवे यांची भीम आर्मीचे चिखली तालुका महासचिव या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.