बुलढाणा (हॅलो बुलढाणा) रुग्ण सेवा ही ईश्वर सेवा मानली जातेय.परंतु रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या कथित भ्रष्टाचारांना याची जाणीव नसावी!शासकीय रुग्णालयात काम करूनही खाजगी रुग्णालयात वारेमाप पैसे लाठणाऱ्यांनी करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करावा आणि भंडाफोड होत असताना राजकीय लोकांना हाताशी धरून केलेल्या पापातून मुक्ती मिळावी यासाठी झटावे,यापेक्षा दुर्दैव ते कोणते?खरे तर दुर्दैव लोकप्रतिनिधींचे आहे.लोक प्रतिनिधी का गप्प बसले?हा प्रश्न असला तरी,’ हॅलो बुलढाणा ‘ कदापि गप्प बसणार नाही!त्याचे कारण ही असे आहे की,
जिल्हा सामान्य रुग्णालयातील भ्रष्टाचारा संदर्भात दैनिक जनसंचालन, सिटी न्यूज,हॅलो बुलढाणाने यशस्वी पाठपुरावा केला.याची फलश्रृती अशी आहे की,विशेषतः हॅलो बुलढाणाने पाठपुरावा केला असता,वरिष्ठांनी कारवाईचे पूर्ण संकेत दिले असून लवकरचअंमलबजावणी होणार आहे. दोषी असलेले जवळपास एक डजन च्या वरती जिल्हा सामान्य रुग्णालयातील तत्कालीन व प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक सह काही अधिकारी व कर्मचारी भ्रष्टाचार केलेल्यावर विविध कलमानुसार फोजदारी दाखल होणार आहेत. भ्रष्टाचारातून कमावलेली चल अचल संपत्ती, अपसंपदाची तक्रारकर्ते पुरावे देऊन उच्चस्तरीय चोकशीची मागणी करण्यातआल्याने एक डजनावरती , कर्मचारी जेलात जाणार असल्याची पक्की माहिती आहे.चंद्रकांत खरात यांच्या कडून माहितीच्या अधिकारातून असे उघड झाले की,लोकायुक्त यांच्याकडे तक्रार केली होती.10 /6 2024 रोजी याप्रकरणी सुनावणी झाली.या प्रकरणातील दोषींवर तीन महिन्यात कारवाई होणार असे आश्वासित करण्यात आले आहे.दरम्यान सदर प्रकरणातील डझनावरील भ्रष्टाचारी गजाआड होणार आहे,अशी माहितीप्राप्त झाली आहे.










