माटरगाव (हॅलो बुलढाणा/सय्यद अस्लम) लहरी पाऊस बरसायचा म्हटलं की,थांबता थांबत नाही..शेगाव तालुक्यातील माटरगाव ग्रामपंचायत मध्ये तर पावसाने रस्त्यांना तलावाचे स्वरूप प्राप्त करून दिले आहे.परिणामी ग्रामस्थांचे हाल होत असून ग्रामपंचायत ने या समस्येकडे लक्ष वेधावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
काही दिवसापासून सारखा पाऊस होत असून नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.शेगाव तहसील अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागात जिकडे तिकडे पाणीच पाणी दिसून येत आहे.विशेषता माटरगाव येथे गुलशन नगर आणि अक्सा कॉलनीत शालेय विद्यार्थी त्रस्त झाले आहेत.अक्सा कॉलनीतील वार्ड नंबर सहा मध्ये जिल्हा परिषद उर्दू हायस्कूल आणि प्राथमिक शाळा आहे.रस्त्यावरील पाण्यामुळे आणि चिखलामुळे विद्यार्थी हैराण झाले आहेत.मच्छरांची पैदास वाढली असून दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे रोगराईला निमंत्रण मिळत आहे.
परंतु माटरगाव ग्रामपंचायत कार्यालय याकडे दुर्लक्ष दिसून येत आहे.ग्रामपंचायत ने सदर समस्यांकडे लक्ष देऊन समस्या सोडवाव्यात अन्यथा 15 ऑगस्ट रोजी आंदोलन करण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते अयाज शेख उर्फ गुड्डूभाई यांनी केले आहे.














