spot_img
spot_img

फसवणूक! उन्नती महिला नागरी पतसंस्थेचे कर्मचारी निघाले फसवे! – १० कोटींच्या फसवणूक प्रकरणी अध्यक्षा, उपाध्यक्षसह 10 संचालक व ३ कर्मचाऱ्यांवर गुन्हा

मलकापूर (हॅलो बुलढाणा / रविंद्र गव्हाळे) स्थानिक उन्नती महिला नागरी पतसंस्थेच्या सहकारी अध्यक्षा, उपाध्यक्षासह १० संचालक व व्यवस्थापक, कर्मचारी अशा १३ जणांवर आज विशेष लेखापरीक्षक वर्ग २ सहकारी संस्था पणन बुलढाणा सौ. ए. एम. व्यवहारे यांनी मलकापूर शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून विविध कलमान्वये १० कोटी रूपयांच्या फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याबाबतची माहिती अशी की, विशेष लेखापरीक्षक वर्ग २ सहकारी संस्था पणन बुलढाणा सौ. ए. एम. व्यवहारे यांनी आज ४ ऑगस्ट रोजी मलकापूर शहर पो.स्टे. ला दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, अंकेक्षण अहवाल २०२२-२३ मध्ये संस्थेतील कर्मचारी, व्यवस्थापक, लेखापाल, रोखपाल, लिपीक तसेच संस्था अध्यक्षांसह, उपाध्यक्षा, कार्यकारी संचालिका व ७ संचालिका यांनी आपले पद व अधिकाराचा दुरूपयोग करून संस्थेतील ठेवीदारांच्या ठेविंचा गैरवापर करून त्यांची फसवणूक करून स्वतःचे आर्थिक हित साधले आहे. त्यामुळे संस्थेच्या जमा असलेल्या ठेविंची रक्कम १२ कोटी ६८ लाख ७३ हजार ३८१ रू. संबंधित ठेविदारांना परत करणे अडचण निर्माण झालीआहे. या बााबीस संस्थेतील संपूर्ण कर्मचारी व संचालक मंडळ जबाबदार आहे. असे नमूद केल्यावरून अध्यक्ष, उपाध्यक्ष, व्यवस्थापक, लेखापाल, रोखपाल व संचालक यांचेकडून सुमारे १० कोटी १३ लाख ४७ हजार ८५० रूपयांच्या अपहाराबाबत वसुली होणे गरजेचे असल्याचे नमूद करण्यात आले असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी तक्रारीत नमूद करण्यात आली आहे. यामध्ये व्यवस्थापक राजेश तांदुळे लेखापाल १८ लाख ९० हजार ८३०, व्यवस्थापक राजेश चव्हाण, लेखापाल रमेश तांदुळे, रोखपाल रूपाली वैद्य/चिमटे असे तिघांची मिळून ५० लाख ०२ हजार ३०६ रू. संयुक्तीक वसुली व्यवस्थापक व संचालक, व्यवस्थापक राजेश चव्हाण, संचालिका अंजली सुमंत पंत, उषा दामोधरदास लखानी, अर्पणा दिलीपराव देशपांडे, सुनिता गजानन जाधव, प्रभावती मधुकर भलभले, सुनिता अनंत चव्हाण, नसरीन बेगम नसीर खान, ज्योती गजाननपंत, मनिषाविवेक बापट, शर्मिष्ठा राजेश यावलकर वैयक्तीक तारण कर्ज ६ कोटी ३८ लाख ५१ हजार ०८६ रू.. अध्यक्षा अंजली सुमंत पंत वेतन व सिटींग चार्जेस ६७ हजार असे एकूण १० संचालक, ३ कर्मचारी यांच्यावर १० कोटी १३ लाख ४७ हजार ८५० रू. यांचेकडून वसुल करणे करीता ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. सौ. ए. एम. व्यवहारे यांनी रविवारी दिलेल्या तक्रारीवरून अध्यक्ष सौ. अंजली सुमंत पंत, उपाध्यक्ष सौ. उषा दामोधर लखानी, व्यवस्थापक राजेश चव्हाण, रोखपाल रमेश तांदुळे, लेखापाल रूपाली वैद्य/चिमटे अशा १० संचालक व ३ कर्मचाऱ्यांविरूध्द कलम ४०६, ४०९, ४२०, १२० (ब), २०१, ३४ भादंवि सहकलम १४६ महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम सहकलम ३ एमपीआयडी अन्वये फसवणुकीचे गुन्हे जिल्हा पोलीस अधिक्षक सुनिल कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल करण्यात आले असून पुढील तपास मलकापूर शहर पो. स्टे. चे ठाणेदार गणेश गिरी हे करीत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!