बुलढाणा (हॅलो बुलढाणा) श्रावण महिन्यातील आज पहिला श्रावण सोमवार असला तरी श्रावण मासाचा आरंभ प्रचंड आहे! श्रावण महिन्यातील सोमवारचे भगवान शिवाच्या पूजेसाठी विशेष महत्व मानले जाते.दरम्यान आज रोहिणखेड येथे कोळेश्वर महादेव मंदिर संस्थानभाविकांचे गर्दीने फुलून गेले असता, आमदार संजय गायकवाड यांनी सपत्नीक रुद्राभिषेक व महाआरती केली.
यावेळी आमदार संजय गायकवाड यांनी कोळेश्वर महादेव मंदिर परिसराचा विकास करू असे आश्वासित केले आहे. बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील मोताळा तालुक्यातील ग्राम रोहिणखेड येथे पवित्र श्रावण मासातील पहिल्या सोमवार निमित्याने हेमाडपंथी महादेव मंदिर कोळेश्वर महादेव संस्थान येथे बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्याहस्ते सपत्नीक महाआरती तसेच रुद्राभिषेक करण्यात आला. तसेच त्यानंतर परिसरामध्ये वृक्षारोपण देखील करण्यात आले.
यावेळी रोहिणखेड येथील गावकऱ्यांनी आमदार संजय गायकवाड यांच्याशी गावातील विविध समस्यावर चर्चा देखील केली.
याप्रसंगी कोळेश्वर महादेव संस्थानचे सर्व विश्वस्त तसेच भाविक-भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.